मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आचार्य चाणक्य हे जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक व्यक्ती होऊन गेले. आचार्य चणक्यांनी जी नीती सांगितली ती आजच्या काळात सुद्धा तंतोतंत लागू पडते, चाणक्य म्हणतात माणसाने या तीन प्रसंगी लाजू नये अगदी निर्लजय होऊन आपली कामे त्यांनी करावीत. तर चला जाणून घेऊ ते कोणते तीन प्रसंग आहेत. तसे तर माणसाच्या अंगी अनेक भाव असतात मानवाला कधी भीती वाटते, तर कधी दुःख होत, कधी हसू येते, तर कधी आश्चर्य वाटते, तर कधी कधी असे देखील प्रसंग येतात ज्यावेळी आपण लाजतो किंवा आपल्याला लाज वाटते, तर मित्रांनो असे अनेक प्रसंग तुमच्या जीवनात आले असतील पण चाणक्य म्हणतात की असे तीन प्रसंग आहेत ज्यावेळी आपण चूकूनही लाजू नये, जर आपण लाजलात किंवा आपण जर लाज बाळगली तर नुकसान हे आपलेच होते…! चाणक्य म्हणतात की दुसऱ्यांचा विचार न करतात अशा प्रसंगी आपण स्वार्थी बनावे आणि स्वतःचे भले करून घ्यावे. यामध्येच आपले भले आहे
पहिली गोष्ट : आचार्य चाणक्य म्हणतात की, तुमच्याकडून जर कोणी उधार पैसे घेतले असतील आणि ती समोरची व्यक्ती जर पैसे परत देत नसेल तर लाजू नका…. लाज न बाळगता तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे त्याच्याकडून परत मागा, मित्रांनो त्या व्यक्तीला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही त्याची गरज भागवलीत व तुम्ही त्याचे काम पूर्ण केले. कदाचित त्यावेळी तुम्ही तुमचे स्वतःचे काम मागे ठेवले आणि त्याचे काम व्हावे यासाठी त्याला उधार पैसे दिलेत, मात्र मग आता पैसे मागे मागताना तुम्ही का म्हणून लाज बाळगता कदाचित तुम्हाला असे वाटते की पैसे पुन्हा पुन्हा मागितले, तर तुमच्यातील संबंध बिघडतील. तर मित्रांनो असे काहीही होणार नाही हे पहा नाते संबंध, मैत्री ही एका ठिकाणी असते आणि व्यवहार हा एका ठिकाणी असतो. नाते संबंधांमध्ये आणि व्यवहारांमध्ये वेगवेगळे पणा आपल्याला ठेवावाच लागेल आणि तरच आपले नुकसान टळणार आहे.
या उलट जर तुम्हाला पैशांची गरज आहे, उदाहरणार्थ तुम्हाला स्वतःचा बिजनेस टाकायचा आहे किंवा दुकान टाकायचे आहे आणि तुमच्याकडे पैसे नाहीयेत तर अशा वेळी लाज न बाळगता तुम्ही पैसे आवश्य मागा, कोणालाही मागा, अगदी बँकेत जाऊन लोन देखील मागा, या ठिकाणी लाज बाळगण्याचे कारण नाही. कारण तुम्ही जर या ठिकाणी लाजलात तर तुम्हाला गरजेच्या वेळी पैसे मिळणार नाहीत तुमचा उद्योग उभा राहणार नाही.
दुसरी गोष्ट : आचार्य चाणक्य म्हणतात की, जेवण करताना कधीही लाजू नये… याचे कारण आहे की आपल्या शरीराला अन्नाची सर्वात जास्त गरज असते व ही आपली प्रमुख गरज आहे, जेव्हा आपण एखाद्या मित्राकडे किंवा पाहुण्यांकडे जेवायला जातो तेव्हा हे लोक तुम्हाला जेवणाचा आग्रह तर करतात, पण तुम्ही जेवताना लाजता तुम्हाला असे वाटते की, दुसरे आपल्याला काय म्हणतील…. तर दुसरे आपल्याला काय म्हणतील याचा विचार करू नका आणि जे तुम्हाला जेवताना नावे ठेवतील त्यांच्या बद्दल लक्षात घ्या की ते तुमचे मित्रच नाहीयेत किंवा पाहुणे सुद्धा नाहीयेत आणि म्हणून अशा ठिकाणी जेवायला जाणे आपण टाळलेलेच चांगले, आपले शरीर जर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आपण जेवण करताना कधीही लाजू नका.
तिसरी गोष्ट: आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्ञान ग्रहण करताना आपण कधीही लाजू नये, कदाचित तुम्ही स्वतः कॉलेजला किंवा शाळेत जात असला किंवा तुमची मुले जात असतील तर लक्षात घ्या व त्यांना सांगा की सध्याची शिक्षण व्यवस्था ही अशी आहे की पैसे घेऊन ज्ञान दिले जाते, सध्याचे शिक्षण हे तुमच्याकडून पैसे घेऊनच तुम्हाला ज्ञान देत असतात आणि म्हणून शिक्षण घेताना तुमच्या मनामध्ये ज्या कोणत्या शंका येतील किंवा ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत अशा गोष्टी त्यांना पुन्हा पुन्हा विचारा, शिक्षकांना विचारा की मला हे समजलेले नाही, मला हे समजावून सांगा, कारण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल त्यावेळी तुम्हाला जॉब करावा लागेल व नोकरीची संधी प्राप्त होण्यासाठी तुम्हाला ज्ञानच तारणार आहे.
ज्ञान हीच आजच्या जगामध्ये ताकद आहे, तुम्हाला जर चांगला जॉब व नोकरी हवी असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे हे ज्ञानच कामी येणार आहे. जे तुम्ही शाळा कॉलेजमध्ये शिकणार आहे व फक्त शाळा कॉलेजच न्हवे तर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी ज्ञान मिळत त्या त्या ठिकाणी ते आत्मसात करा ते पुढे तुमच्या नक्की उपयोगी पडेल.
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
Nice article
Nice your blog is real on life situation! Thank you for sharing.
Nice information…3 stories or thoughts of Arya Chanakya