मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, अभिनव बसवर यांचा एक अप्रतिम लेख..पाहण्याचा वगैरे कार्यक्रम झालेला. एकदिवस त्याचा फोन आला आणि भेटायला येशील का विचारलं. काहीच हरकत नव्हती. ठरल्या वेळेला दोघेही पोहचलो. आपण एकमेकांना जाणून घ्यायला हवं अशी तुटक तुटक सुरुवात त्याने केली. स्वतःबद्दल सगळं काही सांगितलं. पास्ट रिलेशनशिप होत्या, वगैरे वगैरे. पण आता तसं काहीच नाहीये म्हणाला.
मुळात मी पहिल्यापासूनच स्ट्रेट फोरवर्ड. “तू व्ह र्जि न आहेस का ?” असा खोचक प्रश्न मी केला. अंगावर एकदम असा काहीसा प्रश्न आल्यामुळे तो थोडासा बावचळला. त्याची झालेली अडचण पाहून मी स्वतःबद्दल सांगण्यास सुरुवात केली..मी होते पूर्वी रिलेशनशिप मध्ये. कोलेजलाइफ होतं ते. अगदी सगळं झालेलं, अर्थात शारीरिक संबंध सुद्धा.आता आमच्यात तसं काही नाहीये. मुलगी असं स्वतःहुन काहीतरी सांगेन त्याला अपेक्षित नव्हतं. वरवर बोलून त्याने काढता पाय घेतला. मला ते लक्षात आलेलं…
बर्याच दिवसानंतर वडिलांकडूनच कळालं की मुलगा काही तयार नाहीये लग्नाला. असो, हरकत नाही. त्याला हे सगळं झेपलं नव्हतं हे मला तेव्हाच कळालेलं. मुळात काय झालंय माहिती का, आम्ही आजची पिढी बराच पुढचा विचार करतो बरं का. पण पिढी म्हणजे सगळेच नाही. आमच्यातही अनेक गट आहेत. कोणासाठी लग्नाआधी से क्स हे खूपच नॉर्मल तर कुणी विचार देखील करू शकत नाही….
मज्जा सांगते, मी गावाकडे वगैरे जायचे तेव्हा सहज तिथल्या मुलींना मा स्टर बेशन वगैरे काही माहितेय का विचारायचे. प्रश्नचिन्ह असायचं चेहऱ्यावर. आपल्याकडे कसंय की मुलगा वयात आला की तो मा स्टर बेशन वगैरे करतो हे सगळ्यानांच माहित असतं.(कोणी तोंडावर दाखवत नसलं तरी). मुलगी करत असेन हा विचारही येत नाही. अर्थात ज्या मुलींबद्दल असं वाटतं त्या चारीत्र्यहीन वगैरे असतात सगळ्यांच्या दृष्टीने… शारीरिक संबंध ठेवण्याची तीव्र गरज ही फक्त पुरुषाला निर्माण होऊ शकते हा अगदीच गोड गैरसमज. मुलींना त्यातलं काही कळता कामा नये. जे काही असेल ते लग्नानंतर नवरा शिकवेन तिला…
मुलांना सेक्स हवं असतं. त्यामुळे ते मुलीना भावनिक गुंतवतात. मग ते तिच्याशी शरीरसंबंध ठेवतात. एकदा शारीरिक संबंध ठेवले की मुलाचं प्रेम आटतं. ते मुलीला सोडून देतात. त्यामुळे मुलींनी सांभाळून राहावं. याचा अर्थ या सर्व प्रोसेस मध्ये मुलीला कुठेही शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नव्हती झालेली हे आपण गृहीत धरून टाकलं. मुलगी फक्त भावनिक गुंतलेली असते ? शारीरिक इच्छा नसते तिला ? जी काही इच्छा असते ती फक्त पुरुषाला असते ? मुळात सेक्स ही गोष्ट दोघांच्या संगनमताने होते, ती दोघांचीही शारीरिक गरज असते हे मान्य करणार आहोत की नाही आपण..
उद्या नातं फिसकटलं की मुलावर बलात्काराची केस टाकून द्यायची. का तर त्याने भावनिक फसवणूक केली. मुळात जे काही सेक्स झालं त्यात दोघांचाही सहभाग आहे.
मध्यंतरी एक काकू म्हणाल्या की, “या आजकालच्या मुली लग्नाआधी सबंध ठेवतात. थोबाडीत दिली पाहिजे यांच्या. चाबकाने फोडलं पाहिजे. पुरूषाचं काय त्याला हवंच असतं पण यांना अक्कल नसावी का. संस्कृती वगैरे काही आहे की नाही. आमच्यावेळी असलं काही केलं असतं तर विहरीत ढक लून दिलं असतं घरच्यांनी.” बोलण्याचा सगळा रोख जर पाहिला तर मुलगी शारीरिक संबंध कशी काय ठेवू शकते याचाच त्रास जास्त दिसतोय. पुरुषाला त्यांनी गृहीत धरून टाकलय…
सेक्स ही पुरुषाची मक्तेदारी नसून स्त्रीचं देखील त्यात तितकंच योगदान असतं. दोघांच्याही शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी दोघे एकत्र येतात. पूर्वी असं नसायचं म्हणून ते आत्ताही नसेलच असं नाही. शय्येवर स्त्री एक्टीव्ह असली म्हणून लगेच तिला अनुभवी वगैरे शिक्का मारण्याला काही अर्थ नाही. जितकी गरज पुरुषाला निर्माण होते तितकीच ती स्त्रीला सुद्धा.
– अभिनव ब. बसवर
मित्रानो लेख आवडला असेल तर आवर्जून शेअर करू शकता. फोटो प्रतिकात्मक आहे.
No agree
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.