मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, ज्या दिवसात स्वच्छता सर्वात जास्त गरजेची असते, नेमके त्याच दिवसात स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे दुर्लक्ष नंतर आजारात परावर्तित होऊन त्रासदायक ठरू शकते. केवळ अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग झाल्याने अनेक स्त्रियांना स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाण्याची वेळ येते. मासिक पाळीसाठी आज बाजारपेठेत सतराशे साठ प्रकारची सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध असली तरी केवळ ती वापरणे एवढेच स्वच्छतेसाठी पुरेसे नाही. स्त्रियांची मासिक पाळी हा आता न बोलण्याचा विषय राहिलेला नाही.
स्त्रियांना प्रत्येक महिन्यामध्ये मासिक पाळी येत असते. आणि या मासिक पाळी दरम्यान या चुकूनही या 5 चुका करू नका, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
मासिक पाळी दरम्यानच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बद्दल स्त्रियांनी काळजी घेतली पाहिजे. मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होत असल्यामुळे महिलांनी स्वतःकडे दुर्लक्ष करायला नको.
पहिली गोष्ट आहे, व्यायाम टाळणे, अनेक महिला मासिक पाळीच्या दरम्यान व्यायाम करायला टाळतात परंतु हे योग्य नाही. हलका व्यायाम केल्याने त्याच्या होणाऱ्या वेदना थोड्या प्रमाणात कमी होतात, त्यामुळे शक्यतो व्यायाम करणे टाळू नये.
दुसरी गोष्ट आहे, लाईट रंगाची कपडे, लाईट रंग फॅशनसाठी थोडा जास्त प्रमाणात असला तरी, लाईट रंगाची कपडे मासिक पाळी दरम्यान घातल्याने सतत डोक्यामध्ये हाच विचार येत राहतो की कुठे डाग तरी पडला नसेल ना?, अगोदरच वेदना होत असतात आणि त्यातून डाग दिसतोय का याचा ताण घेण्यापेक्षा या दिवसांमध्ये लाईट रंगाची कपडे घालणे शक्यतो टाळावे.
तिसरी गोष्ट आहे, टीव्ही वरील उदासीन प्रोग्रॅम बघणे टाळावे…. या दरम्यान महिला वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांशी झुंजत असतात, कधी आनंदात असतात, तर कधी रागामध्ये, तर कधी चिडचिड, तर कधी असुरक्षित असल्याची भावना येत असते, त्यामुळे उदासीन प्रोग्रॅम बघणे शक्यतो टाळावे.
चौथी गोष्ट आहे, दुग्धजनी पदार्थ म्हणजे दुधाचे पदार्थ, मासिक पाळी दरम्यान वेदने पासून मुक्ती साठी कॅल्शियम चे सेवन करावे पण दुग्धजन्य पदार्थ, जसे पनीर, दही हे खाणे टाळावे हे खाल्ल्याने तुमच्या वेदना वाढू शकतात या ऐवजी दूध पिणे योग्य ठरेल.
पाचवी गोष्ट आहे मीठ खाणे, मासिक पाळी दरम्यान अधिक प्रमाणामध्ये मीठाचे सेवन केल्याने गाठी पडतात, त्यामुळे मीठ जास्त प्रमाणात खाऊ नये, त्या ऐवजी फळभाज्या खाणे योग्य ठरेल. या काळात भरपूर पाणी प्यावे. जेणेकरून डीहायड्रेशनची समस्या जाणवणार नाही.
मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे. स्वच्छता आणि नॅपकिनच्या वापराने संसर्गजन्य आजारापासून वाचता येते. अन्यथा या समस्या उग्र स्वरूप घेऊन वंधत्व येण्याची शक्यता असते. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये. कोणत्याही प्रकारची समस्या झाल्यास जसे अतिरक्तस्राव किंवा अति कमी रक्तस्राव किंवा अनियमित मासिक पाळी यापैकी कोणत्याही त्रासासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
मासिक पाळी महिलांच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. याचा संबंध प्रजनन तंत्राशी असतो. पण अनेकांना असंच वाटतं की, मासिक पाळी असताना शारीरिक संबंध ठेवणं चांगलं नसतं. पण मुळात ही धारणाच चुकीची आहे, असं तज्ज्ञ सांगतात. कारण वैज्ञानिक रूपाने असं कोणतही प्रमाण नाहीये की, मासिक पाळी असताना शारीरिक संबंध ठेवू नये. किंवा मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने महिला किंवा पुरुषाला आरोग्यासंबंधी काही नुकसान होतं. पण हे गरजेचं आहे की, दोघांचीही सहमती हवी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी.
तसेच मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. पण तरी सुद्धा गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी कंडोमचा वापर केलेला कधीही चांगला. त्यासोबतच या दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास संक्रमण होण्याचाही धोका असतो.
ह्या आहेत मासिक पाळी दरम्यान काळजी घेण्याची गोष्टी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा
Nice information
पाळी आल्यावर विदाऊट प्रोटेक्शन संबंध ठेवले तर ?????
जागरूकता करून देणारी माहिती
आणि मासिक पाळी हा विषय कुटुंबात आई वडील यांनी मूला, मुली सोबत मोकळ्या गप्पा मारत चर्चा केली पाहिजे