नमस्कार मित्रांनो आजची ही कथा मनाला हेलावून टाकणारी आहे. रात्रीचे 9 वाजलेले होते.महेश ला त्याच दुकान बंद करायचे होते. पण तो वाट पाहत होता एका आईची…”काय बरं नाव होतं तिचं”?, महेश ने कधी विचारलच नाही. काही दिवसांपूर्वीच महेश ने एक दुकान सुरू केलं होतं. तस ते ज्यास्त मोठं नव्हतं, लहानच होत. त्यात त्याने फक्त बेकरी चे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती. त्या दिवशी त्याने दुकानाच उद्घाटन केलं आणि पहिलंच गिराईक एक बाई आली. तिच्या कडेवर एक लहान व गोंडस बाळ होत. मग तिने दुधाची बाटली घेतली आणि महेश ला म्हणाली! दादा आता माझ्याकडे फक्त 10 रुपयेचं आहेत. बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का?
महेश ने तिच्याकडे पाहिले, ती दिसायला खूप गरीब होती. कपाळावर कुंकू नव्हतं…गळ्यात मंगळसूत्र नव्हतं, कदाचीत तिचा नवरा जीवंत नसेल, असा अंदाज महेश ने लावला. साडीला तर अनेक ठिकाणी ठिगळे लागली होती. आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते. मग महेश ची नजर त्या कडेवरील गोंडस,निरागस बाळाकडे गेली. ते हसत होते, हसत असताना त्याचे ते दोन दात लुकलुकत होते. मग महेश त्या ताईला म्हणाला ताई, काही हरकत नाही तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील…त्या बाईने महेश कडे पाहिलं आणि म्हणाली, उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला. इथे जवळच राहते मी..समोर जी छोटी घरे आहेत ना तिथे राहते मी. महेश म्हणाला काय हरकत नाही ताई.. मग ती तिथून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेश च्या हातात दिले. महेश ते पैसे तिला परत करत म्हणाला ताई पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून काल तुमच्या हातून माझी पहिली बोनी झाली आणि मला काल 1000 रुपयांचा फायदा झाला. हे ऐकून त्या बाईला देखील खूप आनंद झाला. ती म्हणाली दादा रात्री किती वाजे पर्यंत तुमचं दुकान उघड असत. महेश म्हणाला तरी 8 वाजता मी दुकान बंद करतो ताई. हे ऐकून त्या बाईचा चेहरा उतरला… महेश ने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं ! काय झालं ताई काय अडचण आहे का? ती बाई म्हणाली दादा मी या बाळासाठी आणि माझ्यासाठी दुसऱ्यांच्या घरी मोजमजुरी करते. रात्री 8.30 वाजतात मला घरी यायला. पण इथली सर्व दुकाने बंद झालेली असतात. माझ्या बाळाला तसच उपाशी पोटी रडतरडत झोपावं लागत. बोलता बोलता तिचे डोळे पाण्याने भरले…
महेश ला ही हे ऐकून खूप वाईट वाटलं… मग तो तिला म्हणाला काही काळजी करू नका ताई तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय दुकान नाही बंद करणार मी. पण एक अट आहे… त्या त्या बाईने डोळे पुसत विचारले काय अट आहे? महेश म्हणाला तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाहीत. हे ऐकून त्या बाईला पुन्हा रडू आले. पण या वेळी तिच्या डोळ्यातील अश्रू दुःखाचे नसून आनंदाचे होते.आज तिला माणसाच्या रुपात देव भेटल्यासारखे वाटत होते. त्या दिवसापासून ती बाई रोज रात्री या दुकानात यायची आणि दुधाची वाटली घेऊन जायची. असे करता करता 6 महीने उलटून गेले होते. पण रोजच्या काबाडकष्ट ने ती आजारी पडत होती. हळूहळू तिचे शरीर काम देत नव्हते. असच एका दिवशी महेश तिची वाट पाहत होता. रात्रीचे 9.30 वाजले होते. इतक्यात ती बाई महेश च्या दुकानात आली. महेश ने लगेच फ्रिज मधील दुधाची बाटली काढून तिला दिली. आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता.
महेश ने फ्रिज चे दार बंद करत त्या बाईला म्हंटले ताई आज खूपच उशीर केला यायला तुम्हाला. आणि फ्रिज चे दार बंद करून त्याने समोर पाहिले तर समोर कोणीच नव्हते..महेश वाटले उशीर झाल्यामुळे ती घाईघाईने निघून गेली असावी.आणि मग त्याने आपले दुकान बंद केले. आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी ती 8 वाजता पुन्हा आली. आणि येऊन फक्त उभी राहिली..आणि रोज प्रमाणे महेश ने फ्रिज मधील बाटली काढून टेबलावर ठेवली. इतक्यात काही तरी वस्तू खाली पडली म्हणून तो खाली वाकला आणि नंतर तो उभा राहून पाहतो तर काय दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती. पण त्या दिवशी महेश ला तिचा चेहरा बघवत नव्हता..खुपच अशक्त झाली होती ती बाई. तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई 8 वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघून गेली. महेश ने आजही तिचा चेहरा जर निरखून पाहिला तर तिचा चेहरा पांढरा पडला होता.
महेश ला कळून चुकलं की पैसे नसल्याने ती बाई डॉक्टर कडे गेली नसणार. त्याने लगेच आपलं दुकान बंद केलं..आणि घरी निघून आला. मग त्याने आपल्या बायकोला सर्व हकीकत सांगितली. लगेच महेशची बायको महेश ला म्हणाली चला आपण तिला कोणत्यातरी चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जाऊ व तिचे उपचार करू. मग हे दोघे त्या बाईच्या घरी गेले. तर आजूबाजूला कोणाचेच घर नव्हते. मग महेश ने त्या बाईचे दार ठोठावले.पण ते दार हाथ लावताच उघडले गेले मग ते दोघे आता गेले, आणि त्यांच्या नाकात घाणेरडा वास शिरला. तसा दोघांनी नाकाला रुमाल लावला. तरी ते दोघे आणखीन आत गेले. मध्ये खूप अंधार होता.आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज येत होता. महेश ने कशीबशी त्या खोलीतील लाईट लावली. तर समोरचे ते भयानक दृश्य पाहून त्यांचे डोळे विसपरले..दोघांना ही मोठा धक्का बसला.
समोर ती घरीब बाई मरून पडली होती. आणि तिचे शरीर हळूहळू सडू लागले होते. तिच्याकडे पाहून वाटत होते की तीन चार दिवसांपूर्वीच तिने जीव सोडला असावा. पण तिचे डोळे अजूनही त्या खेळत असणाऱ्या बाळाला पाहत होते. आणि ते बाळ त्या बाईच्या डोळ्यांकडे पाहून खेळत होते. त्या निरागस बाळाला हे ही कळत नव्हतं की त्याची आई कधीच त्याला सोडून गेली आहे. बाजूला दुधाच्या बाटल्या पडल्या होत्या. हे दृश्य पाहून महेश व त्याच्या पत्नीच्या अंगावर शहारे निर्माण झाले होते. खरोखरच त्या वेळी ते दृश्य हेलावून टाकणारे होते. महेश ला तर विश्वासच बसत नव्हता. की एका मेलेल्या आईचा आत्मा तीन दिवस त्याच्या बाळासाठी दूध घेऊन जात होते….मग महेश ने त्या बाळाला उचलले.आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं..मग त्या दोघांनी विधी नुसार त्या बाईचे अंत्यसंस्कार केले. आणि त्या बाळाला दोघांनी दत्तक घेतले..
मित्रानो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कंमेंट करून आम्हाला कळवा..
हे फक्त आईच करू शकते 😭
chaan katha
अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट आहे. डोळे पाणावले.
Really good story
NICE HEART TOUCHING KELAS BHAVA…………
kharch khup man helavnare batmi ahe….mala he kalel ka ki hi ji ghtna ghadli ti kute ghadli ani kontya gavi ani kontya rajyat ghadli…plz mala kalava
Omg it’s true yr he jar khar asel tar tya aai la majha salam
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई हया शब्दाचा अर्थचंआत्मा होता म्हणुन प्रत्येक मुलांन मध्ये आईची आत्मेचा वास करतोचं ती सोबत असो व नसो .
Khubhch dukhad ghatna
Parmeshwar pratek balala aaiche sath labho hi prarthna.
आईची ही माया खरोखरच जगात सगळ्या गोष्टींच्या पूढे आहे….♥️आई
खूपच सुंदर आहे दादा कथा 😢😢
Angala shahar aale gosht wacun
Mana pasun mana paryant pahucwnare naate
V aai saarkhe daivat dusre kuni naahi
World Gretest Mom
Dolyat pani aal goshta wachun……tumachy baryach goshti wachalya ….khup chhan lihita tumhi
Maa ke siva koi nahi
hridaysparshi
pudhli story read krayla aawdel