जगातील फक्त १% लोक हे करत असतात, म्हणून पैसा त्यांच्या मागे लागतो…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, असे म्हणतात की पैसा देव नाही… पण देवा पेक्षा अजिबात कमी नाही… एका मोठ्या फिलॉसॉफरचे वाक्य वाचले होते “आयुष्यात पैसा सर्वस्व नाही, पण ऑक्सिजन नंतर जर सर्वात जास्त महत्वाचे काय असेल तर तर आहे पैसा”..! असा हा पैसा.. कोणी काहीही म्हणो पण आज आपल्या देशात 70% समस्या ह्या पैशामुळे आहेत. त्यामुळे आजच्या माहिती मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे काय करता येईल जेणे करून हा पैसा आपल्या मागे लागला पाहिजे. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एक लक्षात ठेवा जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर पहिले पैश्याचा मागे जाणे बंद करा. तुम्ही म्हणाल हे काय सांगत आहे ते जाणून घेण्यासाठी पूर्ण माहिती पहा.

मित्रांनो तुम्हाला काय वाटते? सचिन तेंडुलकर पैशाच्या मागे लागला म्हणून आज त्याच्याकडे हजार करोड पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे?, लता मंगेशकर काय पैशाच्या मागे लागल्या म्हणून त्यांच्याकडे आज शंभर करोड पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे?, पंचवीस वर्षाचा ‘Oyo’ कंपनीचा संस्थापक रितेश अग्रवाल काय पैशाच्या मागे लागला म्हणून आज त्याने तीन हजार करोडाची कंपनी बनवली, किंवा आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस हे काय पैशाच्या मागे लागले म्हणून त्यांची आज दहा लाख करोड पेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे. ह्या लोकांकडे बघा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळेल, सचिन तेंडुलकर यांनी कायम आपला खेळ कसा उत्तम करता येईल या गोष्टीकडे लक्ष दिले म्हणून क्रिकेट चे बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. त्यांनी मेहनत आपल्या खेळावर घेतली.

लता मंगेशकर यांनी आपले गाणे सर्वत्तम कसे होईल या गोष्टीवर भर दिला…. रितेश अग्रवाल ने विचार केला की, मोठ्या हॉटेल मधील रुम्स एका सामान्य माणसाला स्वस्त कसे देता येईल आणि तो विचार अमलात आणला. अमेझॉन चे जेफ बेजोस ह्यांची आहे की ग्राहकाला प्रत्येक गोष्ट घरी बसल्या ती पण उच्च दर्जाची आणि स्वस्त मिळाली पाहिजे. ह्या लोकांनी आपणे काम कश्या प्रकारे उत्तम आणि उत्कृष्ट करता येईल या गोष्टीवर भर दिला आणि त्यांच्या मागे अपोआप पैसे येत गेले. आता दुसरी बाजू पाहुयात, जी माणसे पैश्याचा मागे धावतात, ज्यांच्यासाठी पैसा सर्वस्व असतो, ते हमखास आयुष्यात चुकीचे मार्ग अवलंबतात तुम्ही बघा की, मालमध्ये भेसळ करणे, लोकांना टोप्या घालणे, अशी लोक पैशासाठी काहीही करायला तयार असतात.

पण हा मार्ग जास्त दिवस टिकत नाही, अशा माणसाला भविष्यात जाऊन कुठे ना कुठे फटका हा असतोच, म्हणून जर तुम्हाला असे वाटत असेल की पैसा तुमच्या मागे लागायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही जे काही काम करत असाल. मग तुम्ही नोकरी करत असाल, तर ते उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा, कामावर प्रेम करा, नेहमी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, असे जर तुम्ही केले तर कोणता बॉस तुम्हाला प्रमोशन देणार नाही? कोणता बॉस तुम्हाला पगारवाढ देणार नाही? तुम्ही व्यवसाय करत असाल तर नेहमी ग्राहकांना कशी चांगली सर्व्हिस देता येईल याचा विचार करा, ग्राहकांच्या बरोबर नेहमी प्रामाणिक राहा, एक लक्षात ठेवा तुम्ही जर एकदा ग्राहकांचा विश्वास जिंकलात तर त्या ग्राहकाला दुसरीकडे स्वस्ताने जरी ती वस्तू भेटली तरी तो घेणार नाही. तो तुमच्या कडूनच घेईल म्हणून व्यवसाय करताना तुमचे सगळे लक्ष ग्राहक कसा खुश राहील याच्यावर ठेवा.

पैसा आपोआप मागे येईल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. म्हणून जे काही तुम्ही करत असाल ते काम एकदम टॉपचे करा तुमच्या मागे पैसा धावत येईल…… थोडी मेहनत आहे, पण तेवढेच समाधान देखील आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमवून तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही.
मित्रांनो आम्ही सांगितलेला मुद्दा तुम्हाला पटतो का की तुमचे काही वेगळे मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *