आपणा सर्वांना वाटत असेल की ‘स्त्री’ जातीवर समाजाने खूप अन्याय केलेत, हो हे आधीच्या पिढ्यांपुरतं मान्यही केलं पण आताच्या पालकांना माझा साधा सवाल आहे की, सध्या मॉडर्न होता होता आपल्याला जे संस्कार आपल्या पूर्वजांकडून मिळाले ते आपण आपल्या मुलींना(काही अपवाद सोडले)तर देतोय का? आपण निदान ह्याचातरी विचार करतोय का? आपली संस्कृती किती लयास चालली आहे, मी इथे कपडे, राहणीमान याबाबत बोलत नाहीये. कालानुरूप त्यात बदल होणारंच, त्यात वावगं काहिच नाही. लग्न…लग्न हे आताच्या मुलींना बंधन वाटू लागलं आहे. ‘वुमन एम्पोवरमेन्ट’ च्या नावाने काही मुलींना एवढं उर्मट बनवून ठेवलं आहे की, त्या जराही कॉम्प्रोमाईझ करायला तयार होत नाही आहेत. थोडं काही बिनसलं की लगेच घटस्फोट देणे किंवा सासु-सासऱ्यांसोबत जरा काही वाजलं की सेपरेट राहायचं, चालले माहेरी रहायला अशी धमकी देणे असं सर्रास घडत आहे. मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेला मुलीच चुकीच्या असतात.
पुरुषांमध्येही वाईट गुण आहेतच की पण त्यांना लाईनवर कसं आणायचं हे तुमच्या हातात असतं आणि निसर्गाने अशी अद्भुत देणगी तुम्हाला दिलेली आहे. अशावेळी टोकाचा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही निदान हा देखील विचार करत नाही की लग्न तोडल्याने फक्त तुम्हालाच त्रास होत नाही. तर तुमच्यासोबत दोन फॅमिली मधील मेंबरनाही याचा मानसिक त्रास होतो. आणि कशाही प्रकाराचा मानसिक त्रास हा शारीरिक त्रासापेक्षा काकणभर अधिक वेदनादायी असतो.
असे काही वागण्यापेक्षा जर तुमचं कोणावर प्रेम असेल तर मग ते आपल्या पालकांना सांगा. नाही मानले तर पटवून द्या त्यांना, थोडा वेळ जाईल पण नक्कीच समजून घेतील ते. पण विनाकारण सगळं मनात ठेवून दुसऱ्यासोबत लग्न करून अथवा जर नवीन नाते जोडण्याच्या कंडिशन मध्ये लग्नाला होकार देऊन नंतर भर मांडवात लग्न तोडून आपल्या पालकांसमवेत दुसऱ्या कोणाची लाईफ, त्याच्या फॅमिली चे स्वप्न उध्वस्त करून त्यांना मानसिक त्रासाच्या खोल डोहात बुडवू नका. गेल्या जमान्याच्या मानाने आता निदान तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे आणि तो तुम्ही बजावाच. “Find Until You Didn’t Get Best”.
आणि हो एक गोष्ट महत्वाची मुलींच्या मातांचं देखील प्री-मॅरेज कॉउन्सिलिंग केलं जाणं गरजेचं आहे. आपल्या मुलीला, तिच्या विचारसरणीला समजून घेणं, ती जर कुठे चुकत असेल तर तिला योग्य मार्ग दाखवणं तसेच तिला लग्नासाठी प्रीपेयर करणं हा त्यांचा अशा वेळी महत्वाचा रोल आहे. विशेषकरून मला तुम्हा मुलींना सांगायचं आहे की, जेव्हा तुम्ही कोणासोबत लग्न करायला तयार होता आणि साखरपुडा वगैरे झाल्यावर काही बिनसलं की टोकाची भूमिका घेऊन लगेच लग्न मोडण्यापर्यंत ती गोष्ट नेता ते अयोग्य आणि आत्मघातकीही आहे. अहो पण तुमच्या हे कसे लक्षात येत नाही की ‘Nobody is Perfect In This World’ आणि उद्या तुम्हाला जीवनाच्या कोणत्यातरी वळणावर कसेल न कसले कॉम्प्रोमाईझ करावे लागणार आहेतच. जे दैव-संयोगाने अवखळ वेळी आलेलं आहे ते गोड मानून, त्याचा श्रद्धेने स्वीकार करून बघा तर, मग किती आनंद मिळतो ते. जर आपल्याला कार ड्राइव्ह करताच येत नसेल तर नुसत्या कार बदलून काय फायदा? आपल्याला कार काही वेळ खर्च करून शिकावी लागेल.
स्त्री म्हणजे घराचा पाया. प्रत्येक घराला स्वर्ग बनवायचं की नर्क हे सारं तिच्याच हाती असतं. पण सध्या स्त्रियांची मानसिकता अशी आहे की आम्हाला पुरुषासारखं बनायचं आहे, सक्षम, स्वयंभू etc… etc.. अहो पण तुमच्या ध्यानात हे कसं येत नाही की हजारो वर्षांपासून तुम्हाला पुरुषांपेक्षा उच्च स्थान प्रदान केलं गेलं आहे. तुम्ही निरंतर पुरुषपेक्षा श्रेष्ठच आहात आणि यात काही शंकाच नाही. पण असे equality चे विचार मनात आणून तुम्ही स्वतःला कमीच लेखत आहात आणि लयाला जात आहात इतकं मात्र नक्की !
मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
© सुरज मोकाशी