मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला सत्यघटनेवर आधारित एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहोत, ही प्रेम कथा आहे बंगलोरच्या एका रहिवाशी मुलाची आणि एका शेतकऱ्याच्या मुलीची… शिवम बंगलोर मधील एका परिवाराचा मुलगा आहे आणि एक दिवस त्याने एका मुलीला बघितले आणि बघताच तिला हृदय देऊन बसला. शिवमने जेव्हा त्या मुलीची माहिती काढली तेव्हा त्याला समजले की तिचे वडील एक शेतकरी आहे. मुलगी दिसायला एकदम सुदंर आणि समजदार होती. जरी शिवम पैसेवाला होता तरी त्या मुलीला पटवणे सोपे नव्हते, जेव्हा पहिल्यांदा शिवम त्या मुलीकडे गेला आणि प्रपोज केले तेव्हा तिने सरळ नकार दिला. मुलीला वाटले की, आपण एक शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि मुलगा चांगला पैसेवाला आहे अशात दोघांचे मिलन होणे शक्य नाही.
शिवमने हार नाही मानली तो लग्नाची मागणी घालायला मुलीच्या घरी गेला. मुलीकडच्यांची मागणी मान्य केली आणि दोघांचे लग्न झाले. दोघे आपले वैवाहिक जीवन आनंदाने जगत होते, आणि सगळे काही गुण्यागोविंदाने चालले होते. तेव्हाच अचानक तिला त्वचारोग झाला, मुलीने अनेक उपचार केले पण काहीच फायदा झाला नाही, तिचा तो आजार ठीक होऊ शकला नाही. दिवसांन दिवस तिचे सौंदर्य कमी होत गेले आणि ती आजारी पडायला लागली. आपल्या अशा स्थितीत तिला वाटायचे आपली सुंदरता कमी झाली म्हणून आपल्या नवऱ्याने आपल्याला सोडून द्यायला नको, या काळजीत ती अजूनच कमजोर होत चालली होती. मग एक दिवस कळल की मुलाचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्याच्या दोन्ही डोळयांची दुष्टी गेली.
मुलाचा अपघात झाल्यानंतर ती मुलगी त्याची देखभाल करायला लागली, त्याची दुष्टी गेल्याने मुलीच्या मनातील ती भीती देखील निघून गेली की, आपली सुदंरता कमी झाल्याने आपला पती आपल्याला सोडून देईल. यानंतर दोघे पुन्हा आनंदाने जगायला लागले पण मुलीची तब्बेत दिवसांन दिवस खालावत चालली होती आणि काही दिवसांनी तिचे निधन झाले, ज्यामुळे तो मुलगा ऐकदम ऐकटा पडला आणि त्याने शहर सोडून जाण्याचे ठरवले.
शिवम जेव्हा शहर सोडून चालला होता तेव्हा त्याच्या शेजारच्यांनी त्याला विचारले कि, “आता तू तुझे जीवन कसे जगणार आहेस तुला तर दिसत पण नाही” यावर त्याने जे उत्तर दिले ते ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल आणि आपल्या पायाखालची जमीन सरकेल…. काळजी केल्याबद्दल त्यांचे आभार मानत तो बोलला, “मी आंधळा झालोच नव्हतो तर फक्त आंधळा झाल्याचे नाटक करत होतो”….!! माझी इच्छा नव्हती कि माझ्या पत्नीला तिच्या आजारपच्या कृप्तीमुळे मी तिच्यावर प्रेम करत नाही असे वाटावे, म्हणून इतके वर्ष मी आंधळा असल्याचे नाटक करत होतो. ज्यामुळे ती आणखी आनंदी राहू शकेल हे बोलून शिवम तिथून निघून गेला पण त्याचा त्याग आणि पत्नी वरील प्रेम बघून शेजारच्यांच्या डोळ्यात पाणी आले मित्रांनो आपण कोणावर मनापासून प्रेम केले तर चेहरा आणि सुदंरता यांना तितके महत्व नसते. महत्व असते ते त्या वक्ती च्या वागणुकीला आणि स्वभावाला…..! मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.