नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक ह्र्दयस्पर्शी कहाणी. खूप सुंदर अशी ही गोष्ट ह्रदयाला स्पर्श करून जाणारी आहे. समाजाला सुधारीत करण्याचा वसा तर खूप लोक घेतात, पण त्यावर चालण्याचा प्रयत्न एखादाच करतो. ही गोष्ट वाचल्यानंतर नक्की तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. रात्र बरीच झाली होती, आईला खूप ताप आला होता. गेले 2 दिवसापासून आईला पोटभर अन्न ही मिळाले नव्हते. मुलीची चिंता वाढत चालली होती. वडील लहानपणीच गेले होते. आईला लवकरात लवकर डॉक्टरकडे न्यायला हवे होते. पण पैसेच …नव्हते. तिने मनाशी एक निर्धार केला. ती रस्त्याने निघाली.
समोरून एक तरुण मुलगा येतांना दिसला. तो कामावरून येत होता. ती त्याला म्हणाली, मला पैसे हवेत थोडे….? त्यावर तो मुलगा म्हणाला…कोण तू? मुलगी म्हणाली..! मला पैसे हवेत माझी आई खूप आजारी आहे. मुलगा म्हणाला मी देईल पैसे पण तू परत कसे देणार माझे पैसे. मी तुला ओळखत पण नाही! मुलगी म्हणाली..नी तुझ्या सोबत एक रात्र येईन. मुलगा म्हणाला..काय? तुझं डोकं फिरलं आहे का? मुलगी म्हणाली नाही आहे माझं डोकं ठिकाण्यावर कंटाळा आला आहे या जीवनाचा…आई आता आजारी आहे. बाबा लहानपणीच गेले, भाऊ नाही. आईने मला कसंबसं मोठं केलं. हा समाज तसा दळभद्री आहे. खूप स्वार्थी लोक आहेत, या जगात. एकटी बाई दिसली की लगेच डोळे फुटतात. मी माझ्या वडीलांपासून नाही झालेली,,,मी एका नराधमाची मुलगी आहे. ज्याने मला रस्त्यावर सोडले. मग याच आईनं मला वाचवलं, वाढवलं, लहानाच मोठं केलं, आज तीच आई आजारी आहे. तिच्या डोळ्यात अश्रूं आहेत.
ती मुलगी त्या मुलाला म्हणाली..बोल मग मला पैसे देतोस की नाही? मुलगा त्यावर निःउत्तर होतो. तो तिला पैस्याच पॉकेट देतो. आणि तसाच घरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी ती मुलगी त्या पॉकेटातल्या पत्त्यावर जाते. मुलगा घरीच असतो. जशी ती मुलगी येते, मुलगा म्हणतो, बाबा हीच ती मुलगी जिच्या सोबत मला लग्न करायचं आहे. मुलीच डोकं चक्रावून जात. ती मुलाला म्हणते पण आपलं वेगळंच ठरलय ना? मुलगा म्हणतो आम्हा मराठी लोकांत त्या साठी आधी लग्न करावं लागतं. कारण स्त्रीची इज्जत करण हा आमचा धर्म आहे. करशील का लग्न माझ्यासोबत? मुलीच्या डोळ्यात अश्रू येतात. ती मुलगी त्याला आईला दाखवायला घेऊन जाते.
आईला म्हणते.! आई तुला चिंता होती ना माझ्या लग्नाची. बघ हाच माझा नवरा.आई मुलाकडे बघते आणि म्हणते चला मी श्वास सोडायला मोकळी झाली. आयुष्यभर वेश्या म्हणून जगली देवा! माझ्या मुलीला तरी नीट ठेव..आई तिथेच आपला स्वास सोडते. मुलीच्या तोंडात शब्द अडकतात. मुलगा तिला म्हणतो बरं झालं काल तू भेटलीस आज मला तुझ्या आईच दर्शन मिळालं आणि ते दोघे लग्न करतात आणि खूप सुखी राहतात.