फणसाचे बी खाल्ल्यास आपल्याला मिळतात हे आरोग्यदायी फायदे

मित्रानो फणस म्हंटले की तोंडाला पाणी सुटते, फणस तर सर्व लोकांनी खाल्ले असावे, तर आज आपण फणसाच्या बियांचे कोणकोणते फायदे आहेत हे आज जाणून घेणार आहोत. आपल्याकडे विशेष करून कोंकणाकडे फणस आणि फणसापासून बनलेले पदार्थ म्हणजे फणसाची भाजी, फणस पोळी, फणसाचे वेफर्स, मोरांबा, हे खूपच आवडीने आणि चवीने मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. पण या सर्वांबरोबर फणसाच्या बिया देखील सर्वांच्या आवडीचे असतात. फणसाच्या बिया चवीला जितक्या छान असतात इतकेच त्यात औषधी गुणधर्म देखील आहेत. आज आपण याबद्धलच माहिती घेणार आहोत.

या बिया आपण भाजून किव्हा उकडुन खाऊ शकतो.किव्हा याचा वापर भाजी मध्ये किव्हा बिर्याणी मध्ये देखील करू शकतो.आपण या बिया सुखवून त्याच पीठ दळून त्या पिठाच थालीपीठ किव्हा भाकरी बनवू शकतो. हे खूपच पौष्टीक आहे.आणि या मुळे आपला अशक्त पण जाण्यास मदत होते. फणसांच्या बिया मध्ये आयर्न आणि प्रोटिनस च प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे ते जर आपण लहान मुलांना खायला दिले तर त्यांची शारीरिक व मानसीक वाढ चांगली होईल, हाड बळकट होतील, आणि त्यांचे हॉर्मोन्स देखील बेलेन्स राहतील. तसेच त्यांच्या मेंदूचे कार्य सुद्धा सुधारेल.आणि त्यांची समरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होईल.

तसेच ज्यांची मेहनत खूप होते किव्हा खेळाडूंनी जे नियमित स्पोर्ट मध्ये भाग घेतात क्रिकेट, कब्बडी,फुटबॉल, या मध्ये भाग घेतात. त्यांनी दररोज फणसाच्या बिया किव्हा फणसापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन नियमित आपल्या आहारात केले पाहिजे. याने त्यांची ताकद आणि एनेरजि लेव्हल वाढेलच पण त्याच बरोबर शारीरिक आणि मानसीक आरोग्य देखील चांगले राहील.

बऱ्याच Vegetables लोकांमध्ये प्रोटीन ची शमता कमी असते. फणसाच्या बिया नेहमीच्या खाल्याने त्याची कमतरता देखील निगण्यास कमी होते. आपण या बिया भाजून किव्हा उकडून नेहमीच्या कॅरी करू शकतो. आणि मग आपण या बिया दररोज थोड्याथोड्या प्रमाणात खाल्या तर Energy मिळेल. तसेच थकवा आणि Weekness सुद्धा निघून जाईल. आणि जर रक्त कमी असेल, तर ते देखील वाढण्यास मदत होईल.

जर नियमित आपण या बिया खाल्या तर मानसिक ताण कमी होऊल. फणसाच्या बिया नेहमीत खाल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढेल. आणि त्यामुळे आपले अनेक रोगांपासून बचाव होईल म्हणजे ताप, सर्दी, खोखला. फणसाच्या बिया मध्ये असंख्य फायदे आहेत त्यामुळे जर शरीर चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही सुद्धा बिया खाऊन पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *