मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला हृदयाला स्पर्श करणारी कथा सांगणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. टेबलवर ऑर्डर घेऊन आलेला सुखदेव टेबलावरची माणसे पाहून हबकून गेला, तब्बल 25 वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा पाहत होता. कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले न्हवते, किंवा ओळख दाखवत न्हवते, चौघांपैकी दोघेजण मोबाईल मध्ये व्यस्त होते आणि दुसरे दोघे लॅपटॉप मध्ये व्यस्त होते.
कदाचित आता झालेल्या डील ची आकडेमोड चालली होती, शाळेतील मित्र खूप पुढे निघून गेले होते. आणि तो स्वतः मात्र कॉलेजपर्यंत देखील पोहचू शकला न्हवता. नंतर दोन तीन वेळा त्यांच्या टेबलवर तो गेला, पण सुखदेव ने स्वतःची ओळख त्यांच्यापासून लपवून पदार्थ वाढले. चारही बिझनेस मॅन मित्र जेवण संपवून निघून गेले. आता परत कधी इकडे न आले तरच बरे असा विचार त्याच्या मनात आला स्वतःच्या निष्पळतेमुळे शाळेतील मित्रांना ओळख देखील दाखवता आली नाही म्हणून सुखदेवला खूप वाईट वाटले.
‘सुखदेव टेबल साफ कर..’ तीन हजार रुपयांचे बिल केले पण एक पैसा टीप म्हणून ठेवला नाही साल्यांनी…… मॅनेजर वैतागून बोलला. टेबल साफ करता-करता सुखदेव ने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला, त्या चार बिझनेस मॅन मित्रांनी पेनाने कदाचित त्या नॅपकिनवर पण आकडेमोड केली होती. पेपर टाकत टाकत सहज त्याच्याकडे लक्ष गेले, तर त्यावर असे लिहले होते की, तुला टीप द्यायचा आमचा जीव झाला नाही ह्या हॉटेल शेजारीच आम्ही एक फॅक्टरी घेतली आहे. म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील तू आमच्या बरोबर जेवायला बसला नाहीस उलट आम्हाला तू वाढतोय हे कसे तरी वाटते.
आपण तर शाळेत एक मेकांच्या डब्यातून खाणारे….. आज तुझ्या ह्या नोकरीचा शेवटचा दिवस फॅक्टरीमधील कँटीन कोणी तरी चालवलेच पाहिजे…. तुझेच मित्र, आणि खाली कंपनीचे नाव आणि फोन नंबर लिहला होता आता पर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या टिपला सुखदेवने ओठांना लावून तो कागद किशामध्ये व्यवस्थित ठेवला.
ह्यांना म्हणतात खरे मित्र…. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि त्याच बरोबर तुमच्या अशाच मित्रांचे नाव कमेंट मध्ये लिहून आम्हाला नक्की सांगा.