चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर कच्ची पपई, वजन कमी करण्यासोबत ‘या’ आजारांचा धोका करते कमी…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला कच्ची पपई खाण्याचे फायदे सांगणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. नमस्कार मधुर आणि गोड चव असणारी पपई खाणे सर्वांनाच आवडते, पण मित्रांनो कच्ची पपई खाल्ल्याने एक वेगळ्या प्रकारचे फायदे आपल्या शरीराला होतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत, कच्च्या पपई मध्ये अनेक प्रकारची व्हिटॅमिन असतात, जे आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत बनवून आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून आपले रक्षण करतात.

आठवड्यातून फक्त दोन वेळस जरी ह्या कच्च्या पपईचे सेवन केले तर पोटांतील समस्यांपासून अगदी कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजारांपर्यंत आपले संरक्षण होते. Vitamin A, Vitamin C, magnesium, आणि potassium यांसारख्या घटकांपासून मुभलग असणारी पपई डायबेटिस च्या रुग्णांना अतिशय गुणकारी असते, म्हणूनच कच्ची पपई तुम्ही अगदी नियमित खायला हवी, त्यासाठी तुम्ही तिची भाजी बनवून किंवा पपईचा हलवा बनवून देखील तिचे सेवन करू शकता. आज आपण अशा या कच्च्या पपईचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत.

कच्ची पपई मल्टी व्हिटॅमिनचा स्रोत असल्याने ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता आहे, त्यांनी आपल्या शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता घालवण्यासाठी कच्ची पपई नक्की खावी. त्याच बरोबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील कच्ची पपई उपयुक्त ठरते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी दररोज सकाळच्या नाष्ट्या सोबत कच्ची पपई नक्की खावी. पपईची नैसर्गिक प्रकृती उष्ण असल्याने शरीरातील चरबी उतरवण्यासाठी यातील इंजाइम्स मदत करतात. कच्च्या पपई मधील vitamin A, Vitamin C, vitamin E शरीरातील रोग प्रतिकार शक्ती मजबूत बनवतात. यातील Vitamin C ताण तणाव कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. कच्च्या पपईतील इंजाइम्स पोटातील बुद्धकोष्ट निर्माण होऊ देत नाहीत, जेणे करून पचन शक्ती सुरलित होण्यास मदत होते.

स्थनदा मातांना अनेक प्रकारच्या मायक्रोन्युट्रियनची आवश्यकता असते. अशा वेळी या कच्च्या पपईची भाजी या सर्वांची पूर्तता करते. गर्भवती महिलांनी मात्र या कच्च्या पपईचे सेवन टाळावे. ज्या व्यक्तींचे सांदे दुखत असतील किंवा सांदेवात झाला असेल तर अशा व्यक्तींना कच्च्या पपईचा ज्यूस काही आठवडे पिल्याने सांदेदुखी कमी होते. किंवा ह्या कच्च्या पपईच्या फोडी करून दोन लिटर पाण्यामध्ये उखळून एक चमचा ग्रीन टी पावडर घालून हे पाणी गाळून असे हे कोमट पाणी दररोज साधारण एक महिना सेवन केल्याने सांदेदुखी कायमची बंद होते.
तर मित्रांनो हे आहेत कच्ची पपई खाण्याचे फायदे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *