महाशिवरात्रीच्या दिवशी करा ही सोपी सेवा होईल महादेवांची कृपा….

नमस्कार मित्रांनो 21 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर महाशिवरात्री साजरी केली जाईल. मार्ग,कृष्ण,चतुर्दशी, ही तिथी महाशिवरात्री म्हणून मानली जाते. देवांचे देव व तीन्ही लोकांचे जनक महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी महादेव पृथ्वी च्या अधिक जवळ येतात. तवगुणांचे ते प्राशन करतात, पण या दिवशी मात्र ते विश्रांती घेतात. म्हणून महाशिवरात्री हा दिवस शिवाचा सर्वात आवडता दिवस असतो.

काही जणांना दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते, किव्हा अनेकांना सोमवारी व्रत करता येत नाही. म्हणून या महाशिवरात्रीच्या उपवासनाने सर्व सोमवारचे सर्व व्रताचे या एकाच महाशिवरात्रीला फळ प्राप्त होते.या दिवशी भक्तिभावाने शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात.आणि शिव भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करतात,असे मानले जाते. या दिवशी पूजा केल्यास अडीअडचणी दूर होतात. आणि महादेव प्रसन्न होतात. मित्रानो या दिवशी आपण सर्व उपवास करत असतो. शिवमंदिरात जाऊन पूजा अर्चना करत असतो. या मधेच जर आपण महादेवाची कृपा मुळेवण्यासाठी काही सोपी सेवा केली, तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

जे पुण्य सोळा सोमवार करून मिळते तेच पुण्य तुम्हाला या दिवशी सेवा करून मिळेल. ही सेवा करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच महादेवाची पूजा करावी .पूर्ण एक माळेचा जप ओम नमः शिवाय म्हणत जप करावा. त्यानंतर महामृत्यूनंजय जप 11 वेळा म्हणावा. मित्रानो या महाशिवरात्री तुम्ही सुद्धा हि छोटीशी सेवा करा म्हणजेच 108 वेळा ओम नमः शिवाय, 11   मृत्यूनंजय मंत्र या तीन गोष्टी करा. सगळ्या इच्छा  पूर्ण होतील. आणि महादेवाची कृपा तुमच्या व तुमच्या परिवारावर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *