शनिवारवाड्याचं गुप्त भुयार – जाणून घ्या एक रहस्यमय कथा….

शनिवारवाडा,, पुणे म्हंटले की पहिलं आपल्या डोळ्यासमोर येत तो म्हणजे शनिवारवाडा. पहिल्या बाजीरावानी उभा केलेला हा वाडा गेले अडीचशे वर्ष दिमाखात उभा आहे. आता कदाचीत विश्वास बसणार नाही पण पेशव्यांची गादी असलेली ही जागा एकेकाळी हजारो लोकांची शाही छावणी होती. खरोखरच खूपच भव्य होता हा वाडा. दरवाजे, कारंजे, महाल आणि म्हणाल ते सगळं होत. पण ज्यांने वाडा बांधला त्यांच्यासाठी या वाड्यात एक गोष्ट मात्र नव्हती…. ती म्हणजे “मस्तानी” समाज्याचा रोष ओढवून घेतलेल्या बाजीरावाला ह्या छत्राखाली सारा समाज आणायचा होता.

वाड्यात असलेला मस्तानी महाल या गोष्टीला साक्ष आहे. पण झालं मात्र उलटंच, लोकांनी मस्तानीला कधीच मान्यता दिली नाही. वाड्याच्या मस्तानी महालात ती जेमतेम काहीच दिवस राहिली. आणि लोकांच्या दबावाखाली बाजीरावाला मस्तानी साठी गावाबाहेर महाल बांधावा लागला. वाड्यात असलेल्या सुखसोई नंतर बाजीरावाला कधीच रुचल्या नाहीत. कारणं होत मस्तानी..असं म्हणतात की अनेक दिवस विरहात काढल्यानंतर शेवटी न राहाऊन दोघांची भेट ठरवली गेली. गावाबाहेर असलेल्या एका छोट्या टेकडीवर..पर्वती तीच नाव. झाडाझुडुपांनी बंद असलेली आणि वर फक्त तीन छोटी मंदीर असलेली पर्वती.. उघडपणे भेटणं अवघड झालं होतं, आणि म्हणूनच या गुप्त भेटीसाठी एक भुयारी मार्ग वापरला गेला अस सांगितलं जातं.

गावाच्या मधून काढलेला आणि थेट पर्वतीवर निघणार भुयारी मार्ग. शनिवारवाड्याच्या बांधकामावेळी पाण्याच्या सोई साठी कात्रज तलाव बांधून अनेक अनेक भुयारी मार्ग तयार केले होते. जमिनीखालून काढलेले हे मार्ग कित्येक होते. एक छोटा पर्वती साठी काढलेला रस्ता कोणाच्याच लक्ष्यात आला नाही. पर्वतीत पश्चिमेच्या दिशेने निघणार हे भुयार नीट पाहिलं तर आजही टेकडीवर आहे. बाजीराव मस्तानीच्या प्रेमाच्या मध्ये आलेल्या अनेक अडचणीना माथ करून दोघांना एकत्रित आणणार हे गुपित काळाच्या ओघात मात्र नष्ट झाल.

1828 मध्ये शनिवारवाड्यात एक ठिणगी पडली म्हणतां म्हणता आग वेड्यासारखा पसरली, मिळेल त्या वाटेने पळत सुटलेल्या लोकांना शेवटचा उपाय होता पर्वतीच्या या भुयाराचा. दुमसणाऱ्या या आगीपासून जगल्या वाचलेल्यानी टाकलेल्यानी उड्या या भुयारानी मात्र भरून टाकल्या. वनव्याने जमिनीखालची ही वाट लोकांच्या सकट व त्यांच्या अफाट संपत्ती सकट कायमची दडपून टाकली.
अस सांगितलं जातं की अजूनही जमिनीखाली ही नष्ट झालेली वाट बाळगून आहे. सोन नान, कपडेलते आणि बाजीराव मस्तानीच्या त्या आठवणी…पुरावा आहे फक्त हे हरवलेलं भुयार….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *