रंग माझा वेगळा मालिकेतील दिपा आहे खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर…

एकाद्या व्यक्तीच्या सोंदर्याचे मोजमाप करायचे असेल तर, सर्वात पहिला पाहतो आपण त्याचा रंग.आणि रंगा वरून आजही काही जणांना हिनवले जाते. हीच सोंदर्याची परिभाषा बदलण्यासाठी सर्वांच्या भेटीला एक नवीन मालिका आली. ती म्हणजे “रंग माझा वेगळा”… या मालिकेत मुख्य भूमिकेत रेश्मा शिंदे दिसून येत आहे. रेश्मा ला मेकअप करून सावळ्या रंगाची दाखवण्यात येत आहे. आज आपण रेश्मा विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

तिचा जन्म 27 मार्च 1987 ला मुंबई येथे झाला. आणि तिचे सर्व शिक्षण मुंबई येथूनच पूर्ण झाले. सर्वप्रथम तिला आपण 2010 मध्ये आलेल्या महाराष्ट्राचे सुपरस्टार या शो मधून पाहिलं. बंध रेशमाचे या मालिकेत तिला आपण पाहिलं. त्यानंतर लगोरी, मैत्री रिटर्न्स, या मालिकेतील पूर्वी ही भूमिका खूप उल्लेखनीय ठरली. या मध्ये तिने नाईक आणि खलनायिका या दोन्ही भूमिका बजावल्या. आणि हाच तिच्या आयुष्यतील टर्निंग पॉईंट ठरला.

त्यानंतर 2016 मध्ये आलेल्या “नांदा सौख्य भरे” या मालिकेतून ती ऐका निगेटिव्ह भूमिकेतुन समोर आली. पैश्याचा हव्यास असणाऱ्या एका मुलीची भूमिका उत्तम प्रकारे तिने साखारली. कलर्स मराठी वरील चाहूल या मालिकेत देखील तिने उल्लेखनिय काम केले आहे. मराठी मालिकांसोबत तिने हिंदी मालिकेमध्ये सुद्धा काम केले आहेत. केसरी नंदन या मालिकेत तिने महत्वपूर्ण भूमिका साखारली आहे. तसेच लालबागचा राणी या चित्रपटात सुद्धा ती एका लहान भूमिकेत दिसून आली.

सध्या ती स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा या मालिकेत आशितोष गोखले बरोबर काम करताना दिसून येत आहे. आता हेच पाहायचे आहे की ती सोंदर्याची पदवी कशी बदलते. रेश्मा ने साखारलेल्या या सावळ्या मुलीच्या भूमिकेचं कौतुक प्रेक्षकांन मध्ये दिसून येत आहे. 2012 मध्ये तिने अभिजित चौगुले सोबत लग्न केलं. तो सिव्हिल इंजेनिअर आहे.आणि तो मुळचा कोल्हापूरचा आहे.रेश्मा शिंदे हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *