रिंकू राजगुरू म्हणजेच सैराट फेम आर्ची. हल्लीच कागर नावाचा मकरंद माने दिग्दर्शित चित्रपटात ती झळकली आहे. हा चित्रपट चांगल्यापैकी हिट झाला. या चित्रपटात तिने एका राजकारणातल्या मुलीची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी तिचा एक विडीयो फार चर्चेत होता. त्यात ती डान्सचा सराव करताना दिसली. महत्वाची चर्चा या गोष्टीची होती की रिंकू यांत इतकी बारीक दिसते कशी ? रिंकूला याबद्दल प्रश्न करताच तिने असे सांगितले की सैराट नंतर काही दिवसानंतर तिच्या हे लक्षात आले की ती खूप जाड झाली आहे. तेव्हा तिची दहावीची परीक्षा होती. आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले नाही. म्हणून तिने वजन कमी करायचे असे ठरवले.
तिने वजन कमी करायचा निश्चय बांधला होता. त्यासाठी ती पहाटे चारला उठून व्यायाम करत असे. त्यासोबतच तिने डायेटवर विशेष भर दिला होता. सकाळ संध्याकाळ ती फक्त सलाड खात असे. गोड पदार्थ खाणे तिने सोडून दिले. फिटनेस साठी तिने ट्रेनर ठेवला नाही. तिची आईच तिची ट्रेनर बनली. परिणामी दोन महिन्यात तिचे १२ किलो वजन कमी झाले.
हल्लीच तने एक दाक्षिणात्य सिनेमाही केला होता. पण तो हिट झाला नाही. तरीही त्यातून तिला खूप शिकायला मिळाल्याचे तीसांगते. तिला एक नवीन भाषा शिकता आली. ‘सैराट’नं रिंकूची ओळख बनली. तिला सुरुवातीला फार अवघड जायचे पण मग ती सगळ्या लोकांत रुळली.
तिचे असे म्हणणे आहे की खेडेगावातल्या मुलामुलींना सिनेमाच्या ऑफर मिळतील पण त्यांनी हुरळून जाऊ नये आणि विचारपूर्वक पावले उचलावीत, मीही साधी आहे, आर्चीसारखी असे रिंकूचे म्हणणे आहे.