श्रीमंतांकडे या गोष्टी नेहमीच असतात, ज्या गरीबांकडे कधीच नसतात, काय सांगते चाणक्य नीती… आचार्य चाणक्य हे खूप मोठे अभ्यासक आणि विद्वान होते आणि त्यांच्या प्रसिद्ध नीतीवर अनेक साम्राज्य स्थापन झाली. महत्वाची गोष्ट अशी की त्या काळातील चाणक्य नितीमधील अनेक गोष्टी आताच्या काळातही लागू आहेत. चाणक्य हे कूटनीतीसाठी प्रसिद्ध होते. त्यांना कौटिल्य असेही नाव होते. त्यांची नीती असे सांगते की काही गोष्टी श्रीमंत लोकांकडे नेहमी असतात पण गरीबांकडे त्या नसतात. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या गोष्टी.
चाणक्य नीती असे सांगते की जे लोक धनवान असता त्यांच्याकडे खूप मित्र असतात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर लोक तुमच्या जास्त जवळ येणार नाहीत. समाजकार्य करण्यासाठी पैशांची गरज असते. ज्या व्यक्तीकडे पैसा आहे तीच व्यक्ती समाजात पुढे जाऊ शकते असं आचार्य चाणक्य म्हणतात.
एका श्लोकात चाणक्य सांगतात की ज्यांच्याकडे खूप पैसे असतात त्यांचे नातेवाईक त्यांना धरून असतात, त्यांना मान देतात. इतकेच नाही तर समाजात त्यांना यशस्वी समजले जाते. चाणक्य असेही सांगतात की ज्याच्याकडे खूप पैसे असतात त्यांना ज्ञानी मानले जाते. लोक पैशासाठी अशा लोकांचे खोटे कौतुकसुद्धा करतात.