नताशा स्टानोविक आणि हार्दिक पंड्या यांची प्रेमकहाणी आहे मोठीच रोमांटीक, अशी झाली होती पहिली भेट…भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज हार्दिक पांड्या याचे रिलेशनशिप स्टेटस आता बदलले आहे. नवीन वर्षात त्याने सगळ्यांना मोठे सरप्राईज देत ही महत्वाची घोषणा केली आहे. त्यांचा साखरपुडा झाला असून त्यांनतर त्यांनी या खास सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या आनंदाच्या बातमीसाठी सगळ्यांनीच त्यांचे अभिनंदन केले आहे.
भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या हा मैदानापासून बराच काळ लांब असल्याने त्याचे हे रिलेशन खासकरून चर्चेत राहिले आहे. त्याच्या मैदानात परतण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असून तो लवकरच परत मैदानात उतरेल असे सांगितले जात आहे.
नाईट क्लब मध्ये जुळले सूर
आता सगळ्यांनाच ही उत्सुकता आहे की ह्या दोघांचे प्रेम नक्क्की जमले तरी कसे ? सूत्रांच्या माहितीनुसार ह्या दोघांची भेट मुंबईतील एका नाईटक्लब मध्ये झाली. हळू हळू त्यांच्यातील भेटी आणि संवाद वाढत गेला आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. हळू हळू त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांचे हे प्रेम जगासमोर येत गेले.
मिडीयावर त्यांच्या या नात्याची चर्चा सुरु झाली. ते एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवू लागले आणि कमी वेळात एक नाते तयार होऊ लागले. ती हार्दिकच्या पार्ट्यांमध्ये दिसू लागली. सगळ्यात महत्वाचे असे की त्याने ज्या पद्धतीने तिला प्रपोज केले तो एक अनोखा अनुभव होता.