थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू खाल्ल्याने मिळतात आश्चर्यकारक फायदे…

आता थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. अशा वातावणात उष्ण पदार्थ खाऊन शरीराला फायदाच होईल. या वातावरणात असेल पदार्थ खायला हवेत ज्यातून शरीरात उष्णता निर्माण होईल जसे की, तीळ, गुळ वगैरे. त्यामुळे थंडी कमी लागेल. या मौसमात डिंकाचे लाडू खाणे खूप फायद्याचे मानले जाते. याने शरीरात उष्णता निर्माण होऊन समतोल राखला जाऊ शकतो.

उष्णता निर्माण होते

डींक मुळातच उष्ण असल्याने याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडी कमी लागते.म्हणून हिवाळ्यात या लाडूंचे सेवन करणे आवश्यक आहे. रोज एक डिंकाचा लाडू खाल्याने शरीरात आवश्यक ती उष्णता निर्माण तर होईलच पण सर्दी खोकला या सारख्या विकारांशी सामना करणेही सहज शक्य होईल.

स्नायूंचे दुखणे

थंडीच्या वातावरणात स्नायु दुखतात आणि अशा वेळी डिंकाचे सेवन खूप फायद्याचे ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही आणखी आरोग्यदायी व्हाल. यांमुळे तुम्ही कमी आजारी पडाल.

हाडे मजबूत होतात

जर तुमची हाडे ठिसूळ झाली असतील तर नक्की डिंकाचे लाडू खा, याने तुमची हाडे मजबूत होऊन हाडांचे दुखणे बंद होईल\. कोणत्याही वयातल्या व्यक्तींसाठी हे लाडू गुणकारी तसेच लाभदायक आहेत. रोज रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधाबरोबर याचे सेवन केल्याने अधिक फायदा होईल.

कमजोरी आणि बद्धकोष्ठता यांवर गुणकारी

याने तुमची ताकद वाढेल आणि कमजोरी दूर होईल. बद्धकोष्ठता तसेच पोटाच्या इतर विकारांवरही हे खूप गुणकारी आहे. ज्या महिलांना सतत थकवा जाणवतो त्यांनी जरूर डिंकाचे लाडू दुधाबरोबर घ्यावेत.

रक्ताची कमतरता भरून निघते

जर तुमच्या शरीरात रक्ताची पातळी कमी असेल तर नक्की डिंकाचे लाडू खा कारण हे लाडू शरीरातील रक्ताची कमी भरून काढतात.

डिंकाचे लाडू खाताना काय लक्षात ठेवाल
• हे लाडू गोड असतात म्हणून डायबीटीजच्या पेशंटनी हे लाडू खाताना काळजी घ्यावी.
• हे लाडू खाताना प्रमाणात खावेत, जास्त लाडू खाल्ल्याने पोट बिघडू शकते.
• ह्या लाडूंनी शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हे प्रमाणाबाहेर खाऊ नयेत.
• उच्च रक्तदाब असलेल्यांनी या लाडूंचे सेवन करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *