क्रिकेट आणि चित्रपटांचे खूप जुने नाते आहे, चित्रसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी क्रिकेटरशी लग्न करून स्वतःचे घर बसवले. वर्ल्डकप दरम्यान सगळा देश क्रिकेटचा जल्लोष करत होता आणि त्याच बरोबर त्यांच्या या अभिनेत्री पत्नीही चर्चेत येत होत्या. आता पाहूया कोण कोण आहेत त्या.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
वर्ल्डकप मध्ये उत्तम कामगिरी करूनही भारताचा पराभव झाला.. या दरम्यान निराश झालेल्या विराटला अनुष्काने आधार दिला. तिने त्याचा उत्साह वाढवला आणि आता ती स्वतःसुद्धा कामाला लागली आहे. अविनाश तिवारी आणि तृप्ती दिम्री यांच्या प्रोडक्शन हाउस साठी ती काम करते आहे.
जहीर खान आणि सागरिका घाटगे
२०१७ साली जहीर खान याने सागरिका घाटगे या अभिनेत्रीशी विवाह केला. जहीर खान याने जरी क्रिकेटमधून सन्यास घेतला असला तरी सागरिका मात्र ऑलट बालाजी यांची वेब सिरीज बॉस बाप यांत काम करात आहे. यांत तिच्याबरोबर कर्ण सिंघ ग्रोवर भूमिका करणार आहेत. १२ जुलै ला याचा ट्रेलर झाला आणि २ ऑगस्टला त्याचा प्रीमियर होणार आहे.
हरभजन सिंग आणि गीता बात्रा
यांचे लग्न २०१५ मध्ये झाले असून त्यांना एक मुलगीही आहे. गीताला सायकोलॉजीस्ट बनायचे होते पण तिच्या नशीबात चित्रपट होते. लग्नानंतरही ती चित्रपटजगतात सक्रीय राहिली आणि आतापर्यंत तिचे अनेक सिनेमे गाजले जसे की द ट्रेन, जिला गाजियाबाद वगैरे. सेकंड हेंड batsman मध्ये तर हरभजन सिंहने एक भूमिकाही निभावली होती.
युवराज सिंह आणि हेजल कीच
बॉडीगार्ड चित्रपटात काम करणाऱ्या हेजल कीच हिने युवराज सिंह यांच्याशी २०१६ साली विवाह केला. त्यानंतर ती चित्रसृष्टीशी अलिप्त राहिली पण सोशल मिडीयावर मात्र ती आजही सक्रीय आहे. चंडीगड येथे त्यांच्या विवाहाचा दिमाखदार सोहळा पार पडला होता.