महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे याच्या बद्दल बरंच काही!

लहान मुलं ही देवा घरची फुलं अस आपण नेहमी म्हणतो. पण जर लहान मुलं मोठ्या माणसांसारखी वागायला लागली तर सर्वांचच कुतुहल वाढणं स्वाभाविक आहे. सगळ्यांनाच उचूकता असते त्या मुलांबद्दल जाणून घेण्याची. असेच कुतुहल अहमदनगर जिल्ह्यातील किंबहूना सगळ्या महाराष्ट्राला आहे ते म्हणजे घनश्याम दरोडे या लहान मुलाबद्धल. आज आपण त्याच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

घनश्याम दरोडे याचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार या छोट्याशा गावात झाला. त्याच वय साधारण 16 ते 17 वर्ष असेल. वडिलांचे नाव दत्तात्रय दरोडे असे आहे. वडील शेतकरी असल्याने घरची परिस्थिती नाजूक होती. घनश्याम याने टाकळी लोणार मध्ये साईकृपा माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये शालेय शिक्षण घेतलं. घनश्याम ला एक मोठी बहीण सुद्धा आहे. नगर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. परिणामी वडिलांची शेती असल्याने शेतीत मात्र काही पिकत नव्हतं. त्यामुळे घनश्याम च्या वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत राहिला.

घनश्याम च्या डोळ्यासमोर हे सर्व घडत असताना घनश्याम ला शेतकऱ्यांन विषयी आस्था वाटू लागली. खेळण्या-बागडण्याच्या वयात घनश्याम ला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काळजी वाटू लागली. वयाच्या 12 वर्षी घनश्याम शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू लागला, आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवू लागला. इतक्या लहान वयात शेतकऱ्यांन पासून ते राजकारणत भाषण करू लागला. मात्र तो एक कुतुहलाचा विषय वाटतो. घनश्याम खरा प्रसिद्धी मध्ये आला जेव्हा विधानसभा निवडणूकी वेळी. श्रीगोंदा तालुक्यातील संग्राम जगताप यांच्या बाजूने घनश्याम प्रचार करत होता. या वेळी केलेली भाषणे आणि त्याने मांडलेले शेतकऱ्यांचे प्रश्न हे लक्षवेदी ठरले. त्याची ही भाषणे सोशल मीडियावर धुमाकुळ घालत होती.

परिणामी संग्राम जगताप यांनी निवड झाली. म्हणूनच तो आज छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोट ठेऊन घनश्याम सरकारवर अचूक निशाणा साधतो. वीज,आत्महत्या, पाणी,पिकांना बाजारभाव,अश्या विविध प्रश्नांवर वर बेधडक भाष्य करत त्या वरती उपाय सुद्धा सुचवतो. अनेक गावांत जाऊन तो शेतकऱ्यांनची भेट घेतो. आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतो. घनश्याम ला पुढे शिकून कलेक्टर व्हायचं आहे. कलेक्टर होऊन त्यांना शेतकऱ्यांनचे प्रश्न सोडवायच आहे. तर मित्रांनो घनश्याम बद्दल तुम्हाला काय वाटतंय कंमेंट करून नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.