सिद्धिविनायक मंदिराशी सं बंधित आहेत हि काही मनोरंजक तथ्ये जी तुम्ही कधी ऐकलीच नसतील….महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्राला निसर्गाची भेट मानले जाते. येथे हिरवळ, समुद्री तट आणि डोंगर या तिन्ही गोष्टी दिसतात. रत्नागिरी जिल्ह्याच्या अशा सुंदर तटावर गणपतीचे एक सुंदर देऊळ आहे. हे मुंबईहून साधारण ३७५ किमी लांब निसर्गाच्या कुशीत विराजित स्वयंभू गणपती मंदिर आहे. जे गणपतीपुळे नावाच्या लहान गावात वसलेले आहे.
पश्चिम द्वार देवतेच्या रुपात होते पूजा
महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात समुद्राच्या किनार्यावर एका डोंगराच्या पायथ्यावर श्री गणपतीपुळे मंदिर वसलेले आहे. असे म्हणतात की इकडे दर्शन घेणाऱ्या भक्तांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. असे मानतात की गणपतीपुळ्यात गणपती स्वयंभू आहे. येथे गणपतीला पश्चिम द्वार देवतेच्या रुपात मानले जाते. येथे गणपतीच्या स्वयंभू प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी भाविक दूरदूरहून येतात. विशेषतः बुधवारी या मंदीरात मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात.
४०० वर्षे जुने आहे मंदिर
मंदीरात भक्तांचा गोतावळा वर्षभर चालू असतो आणि गणेशोत्सवाच्या दरम्यान येथे केलेली रोषणाई सुंदर असते. येथे वसलेले स्वयंभू गणपती मंदीर पश्चिम द्वार देवतेच्या रूपातही प्रसिद्ध आहे. हे मंदीर ४०० वर्षे जुने असून मंदीरात वसलेली गणपतीची मूर्ती एका अखंड खडकापासून बनलेली आहे. असे म्हणतात की हा गणपती बाप्पा इथे स्वतः प्रकट झाले होते.
स्वप्नात दिले होते दर्शन
असे म्हणतात की आता ज्या ठिकाणी मंदीर आहे तिथे एक ब्राह्मण राहत होता. एक दिवस गणपतीने त्याला स्वप्नात सांगितले की हा डोंगर म्हणजे माझे निराकार रूप आहे आणि जी व्यक्ती माझी पूजा करेल त्याचे सगळी संकटे मी दूर करीन. त्याच दरम्यान ब्राह्मणाची एक गाय जिने दूध द्यायचे बंद केले होते, तिच्या कासेतून दूध येऊ लागले. त्या ठिकाणाची जेव्हा सफाई केली गेली तेव्हा तिथे गणपतीची तीच मूर्ती मिळाली जी ब्राह्मणाच्या स्वप्नात आली होती. या नंतर मंदिराची स्थापना केली गेली.
नोट- अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नसून तुमचं निव्वळ मनोरंजन करण्यासाठी ही कथा आहे हे लक्षात ठेवा.