चाणक्य नीतीनुसार गाढवाकडून शिका या ३ गोष्टी, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही…

मित्रांनो अस म्हणतात चाणक्य नीतीचेजो कोणी जीवनात आचरण करतो त्याची कधीही फसवणूक होत नाही आणि त्यांना प्रत्येक कार्यात ज्यास्तीत ज्यास्त यश मिळते. चाणक्य सांगतात बुद्धीमान आणि हुशार माणसाने प्रत्येकाकडून काहीतरी शिकले पाहिजे मग तो प्राणी असो किव्हा मनुष्य असो…चाणक्यानी प्राण्यांकडून काय गौष्टी शिकायच्या हे सांगितले आहे. त्यांपैकी “गाढव” हा एक प्राणी आहे. आजच्या या लेख मध्ये आपण गाढवा कडून अश्या गौष्टी शिकणार आहोत जे आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायला मदत करतील.

पहिली गौष्ट गाढव कितीही थकला तरी तो ओझं उचलायच काम सुरू ठेवतो.आणि आपलं ठिकाण जो पर्यंत येत नाही तो पर्यंत चालत राहतो. तसेच माणसाने सुद्धा कितीही थकवा आला तरी आपल्या धेय प्राप्तीसाठी आणि कार्य प्राप्तीसाठी सतत प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. असे होऊ शकते की ध्येय प्राप्तीसाठी त्याला अनेक गौष्टीचा सामना करावा लागेल, अश्या वेळेस तो हार मानण्याची शक्यता असते. पण गाढव जसा न थकता, न थांबता जसा पुढे चालत राहतो तसेच माणसाने सुद्धा संकटांचा सामना ध्येर्याने  केला पाहिजे.आणि सतत न थकता पुढे चालत राहिले पाहिजे…..

दुसरी गौष्ट गाढव कोणताही ऋतू असुदे त्याची परवा करत नाही. थंडी असुदे पाऊस असुदे ऊन असुदे गाढव आपले काम सातत्याने करत राहतो. त्याच्यावर कोणत्याही ऋतूचा परिणाम होत नाही. अश्याच प्रकारे माणसाने सुद्धा आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कोणत्याही ऋतूची परवा न करता, सतत काम केले पाहिजे. बऱ्याच लोकांना कारणे द्यायची सवय असते. जसे की खूप ऊन आहे, खूप पाऊस आहे, खूप थंडी आहे त्यामुळे ते कायमची टाळाटाळ करतात. पण हुशार माणसाने ऋतू गरम आहे की थंड याचा विचार न करता आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे….

तिसरी गौष्ट गाढव परिस्थिती नुसार त्याला जे चरायला भेटते ते चरते आणि नेहमी संतुष्ट राहते. तसेच माणसाने सुध्दा त्याला जे आयुष्यात भेटले आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहावे, समाधानी राहावे आणि चांगल्या गौष्टीसाठी प्रयत्नशील राहावे. लोकांना सतत रडायची सवय असते माझ्याकडे हे असते हे तर मी हे केले असते, माझ्याकडे ते असते तर मी ते केले असते, आणि अशी माणसे आयुष्यात कधीही संतुष्ट राहत नाहीत.  या होत्या तीन गौष्टी ज्या आपण गाढवा कडून शिकू शकतो.

तर, मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडल्यास, महत्वाची वाटल्यास शेअर नक्की करा…  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *