मुलीच्या लग्नाच्या वेळी अमिताभ यांनी असे काही केले जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल…

बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन एक सर्वोत्तम पुरुष म्हणून ओळखले जातात. अभिनय असो किंवा व्यक्तिगत जीवन, ते आपली प्रत्येक भूमिका चोख बजावतात. ते आपल्या वैयक्तीक आयुष्यात इतके साधे राहतात की लोक त्यांचे उदाहरण देतात. अभिनयाइतकेच प्रेम त्यांचे आपली मुलगी श्वेता हिच्यावर आहे. आता श्वेता बच्चन, श्वेता नंदा झाली असून ती तिच्या वडीलांची खूप लाडकी आहे. प्रत्येक कार्यक्रमात ते तिला न विसरता घेऊन जातात.

आजही ते तिची काळजी अशी घेतात जणू काही ती अजून लहानच आहे. ते अजूनही कोणत्याही कार्यक्रमात लहान मुलीप्रमाणे तिचा हात धरून ठेवतात. त्यांच्याबद्दल हे बोलले जाते की ते सगळ्याच स्त्रियांचा खूप आदार करतात. बॉलीवुडमध्ये अमिताभ यांच्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत, जसे की त्यांचे वेळेवर येणे, त्यांच्या ज्युनियर्सना  सन्मान देणे आणि कामानंतर आपल्या कुटुंबाला वेळ देणे.

आजही ते त्यांच्या मुलीशी खूप जोडले गेले आहेत. त्यांचे तिच्यावर इतके प्रेम की जेव्हा तिची पाठवणी झाली तेव्हा सगळ्यात जास्त अमिताभ रडत होते. जेव्हा ती डोलीत बसली तेव्हा त्याने तिच्या पावलांचे ठसे घेऊन त्याची एक फ्रेम बनवून ती घरात सजवली. सगळे लोक वडीलांची हि माया पाहून थक्क होतात. आजपर्यंत असे कोणीच केले नाही. त्यावेळी अमिताभ यांनी सांगितले होते की आज माझ्या घरातून लक्ष्मी जात आहे, निदान तिचे चरण तरी या घरात राहूदेत. त्याची ही गोष्ट खरोखरच हृदयस्पर्शी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *