बादशहा अकबर याच्याबद्दल बोलायचे झाले तर भारताच्या इतिहासात शहेनशहाच्या बाबतीत लोकांच्या मनात एक हिंदूद्वेष्टा आणि क्रूर शासक अशी प्रतिमा तयार झाली आहे. अकबराशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याची माहिती कदाचित तुम्हाला नसेल. अकबराची अनेक नावे होती, त्याला अनेक नावांनी संबोधित केले जाते. शहेनशहा अकबर त्याच्या काळातला एक महान शासक होता. त्याने भारत देशाची प्रगती आणि उन्नतीसाठी त्याची सगळी ताकत लावली होती. त्यांच्या अनेक नावांमागे काही कारणे आहेत आणि ती कारणे खूप कमी लोकांना माहिती आहेत. मग चला तर ती कारणे जाणून घेऊया.
फार कमी लोकांना हे माहिती असेल की बादशाह अकबरला तीन मुली होत्या आणि त्यांना त्याने आजन्म अविवाहित ठेवले. तो असा शहेनशहा होता ज्याला त्याची आन बान आणि शान यापेक्षा जास्त काही प्रिय नव्हते. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते, पण जर त्यांनी त्यांच्या मुलींची लग्ने लावली असती, तर वधूपिता म्हणून त्याला वरांच्या समोर झुकावे लागले असते. आणि याच कारणासाठी त्याने मुलींना आजन्म अविवाहित ठेवले. त्याने सुरु केलेली हि परंपरा औरंगजेब, जहांगीर, आणि शाहजहान यांनीही कायम ठेवली. त्यांनीही आपल्या मुलींना कायम अविवाहितच ठेवले.
हरम मध्ये किन्नरांची फौज
बादशहा अकबराचे हरम म्हणजे त्याच्या बेगमचे कक्ष जिथे होते तिथे कोणत्याही पुरुषांना जाण्यास बंदी होती. हेच कारण होते ज्यामुळे त्याने त्याच्या बेगमांच्या सेवेसाठी किन्नरांची नियुक्ती केली. त्याच्या प्रत्येक बेगमेच्या सेवेसाठी किन्नरांची फौज असायची आणि हे किन्नर रात्रंदिवस बेगमांची सेवा करायचे. जोधा अकबर चित्रपटात तुम्ही हे पाहिले असेल की बादशहा अकबरच्या बेगमांच्या सेवेत फक्त किन्नर असायचे.
हिंदू राजाने केले अकबराचे अंत्यविधी
बादशहा अकबराला हिंदूद्वेष्टा म्हणूनही बरेच लोक ओळखतात आणि असे म्हणतात की औरंगजेबही अकबराच्या पावलांवर पाउल ठेवून चालत असे. औरंजेबानेही हिंदूंना क्रूर वागणूक दिली. यांमुळे त्रस्त होऊन त्याचा बदला घेण्यासाठी एका हिंदू शासकाने अकबराची कबर उकरून त्यातील हाडे काढून घेतली आणि मग त्याचे दफनविधी केले. काही राजांना त्यांची आण, बान आणि शान यांच्या पलीकडे काहीही नसते आणि याचसाठी ते काहीही करायला तयार असतात. अनेक राजे भारतात होऊन गेले पण अकबरासारखा कोणीही झाला नाही. त्याच्यात अनेक त्रुटी होत्या, ज्यांमुळे जनता नाराज असायची. जशा त्रुटी तसेच अनेक चांगल्या गोष्टीही होत्या आणि म्हणूनच लोक त्यांना शहेनशहा म्हणायचे. बादशहा अकबराने अशी अनेक कार्ये केली ज्यांनी लोकांचे आयुष्य बदलले. म्हणूनच इतिहासाच्या सोनेरी पानावर त्याचे नाव कायमचे कोरले गेले आहे.