ह्या कारणामुळे अक्षय कुमार नेहमीच आपल्या मुलीचा चेहरा लपवतो …

अक्षय कुमार बॉलीवुडचे असे एकमेव अभिनेते आहेत जे एकाच वर्षात अनेक सुपरहिट चित्रपट देतात. खरे तर अक्कीचा असा विश्वास आहे की, ते लोकांचे मनोरंजन करताना कोणतीही कंजूसी करू इच्छित नाहीत. याच कारणाने या वेळी एकाच वर्षांत सलग हिट चित्रपटांची शृंखला बनवणारे खिलाडी अक्षय कुमार हे स्वतःच्या कामात इतके समर्पित आहेत. इतकेच नव्हे तर कुटुंबाची जबाबदारीही ते तितक्याच समर्थपणे पेलतात. ते त्यांची मुलगी नितारा हिला नेहमीच कैमर्याच्या चमकीपासून लांब ठेवतात.

कदाचित एखादाच असा फोटो असू शकेल ज्यात लहानग्या निताराचा चेहरा दिसून आला असेल. वास्तविक असे आधीही अनेक वेळा घडले आहे, की एखाद्या कार्यक्रमात फोटोग्राफर अक्कीच्या अगदी जवळ येऊन उभे राहिले आहेत. पण तो मात्र तिला जवळ घेऊन सगळ्यांच्या नजरांपासून वाचवतो. असे काय कारण आहे ज्याने अक्की त्याच्या मुलीचा चेहरा जगासमोर आणू इच्छित नाही? जेव्हा आम्ही यांवर शोध घेतला तेव्हा काही हृदयस्पर्शी गोष्टी समोर आल्या.

फक्त चित्रपटातच नाही तर खर्या आयुष्यातही अक्षय कुमार खिलाडी बाबा आहे. होय, त्याला वाटते की त्याच्या मुलीने या मायानगरीपासून लांब राहावे कारण त्यामुळे आयुष्यातील खर्या आनंदाला त्ते मुकतील. म्हणून ते नेहमीच निताराचा चेहरा लपवून घेतात, जेव्हाही कोणी तिचा फोटो घ्यायचा प्रयत्न करतो.

ही गोष्ट सगळ्यांना जरा चमत्कारीकच वाटते कारण अनेक असे बॉलीवूड कलाकार असतात, जे जाणूनबुजून आपल्या मुलांना जगाच्या समोर आणतात आणि या प्रकाझोतात जवळपास ढकलतात. पण अक्की तसा नाही, त्याला त्याची बापाची भूमिका करणे जास्त महत्वाचे वाटते. त्याला असे वाटते की या झोतापासून तिने लांबच राहावे नाहीतर तिचे बालपण या सगळ्यात हरवून जाईल.

तर, मित्रांनो अक्षय कुमार यांच्या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *