या मराठमोळ्या गायकाने धुडकावला होता, माधुरी दीक्षितचा लग्नाचा प्रस्ताव…

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील एक सर्वोत्तम कलाकार आहे. तिने श्रीराम नेणे याच्याशी लग्न केले. पण एक वेळ अशीही होती की जेव्हा तिचे स्थळ प्रसिद्ध मराठी गायक सुरेश वाडेकर यांनी धुडकावून लावले होते. हल्लीच प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने पन्नास वर्षे पूर्ण केली. आज ती दोन मुलांची आई आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा तिचे स्थळ प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी नाकारले.  तर घडले असे की माधुरी ही एका कट्टर मराठी कुटुंबात जन्मलेली असून, तेव्हा ती नवनवीन चित्रपटात येत होती आणि तिच्या वडीलांना असे वाटत नव्हते की तिने या क्षेत्रात करीयर करावे. आणि म्हणून ते तिच्यासाठी मुलगे पाहू लागले.

एका वेबसाईट मध्ये आलेल्या माहितीनुसार माधुरीचे कुटुंबीय तिचे स्थळ घेऊन गायक सुरेश वाडकर यांच्यापर्यंत पोहोचले. त्या काळात सुरेश वाडकर त्यांचे संगीतातील करीयर सुरु करत होते. त्यांच्याकडे त्यांच्याहून वयाने १२ वर्षे लहान असलेल्या माधुरीचे स्थळ आले पण त्यांनी हे सांगून नकार दिला की, मुलगी फारच बारीक आहे. त्यावेळी तिच्या वडीलांना ही चिंता होती की, जर मुलगी चित्रपटात फार कामे करू लागली तर, तिचे लग्न जमण्यात अडथळे येतील.

पण तरीही माधुरीच्या नशीबात या क्षेत्रात करीयर घडविणे, आणि यशस्वी होणे लिहिलेले होते. अखेरीस ती या क्षेत्रात नावारूपाला आली आणि प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिचे लग्न लंडन मध्ये राहणाऱ्या डॉक्टर राम नेने यांच्याशी झाले.

दुसरीकडे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी त्यांच्यापेक्षा वयाने १२ वर्ष लहान त्यांची विद्यार्थिनी पद्मा वाडकर हिच्याशी विवाह केला. हल्ली त्या झी टीव्हीच्या लिटिल चैंप्स कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *