देवयानी या मालिकेतुन घरोघरी घरी पोहोचलेल्या शिवानी सुर्वेला, आजही कोणी विसरू शकत नाही. तिने स्टार प्रवाह वरील देवयानी या मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकारली होती. तर आज आपण तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेऊया. शिवानी सुर्वे हीचा जन्म मुंबई मध्ये २३ ऑगस्ट १९८४ मध्ये सामान्य कुटुंबात झाला. तिने आपले शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण डोंबवली मधेच पूर्ण केले.
लहानपणापासूनच शिवानीला डान्स करायला आवडायचं…म्हणून ती आपल्या शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमात खूप भाग घ्यायची. जेव्हा तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, तेव्हा तिने आपलं करिअर अकटिंग मध्येच करायचे ठरविले. आणि तिने आपलं करिअर अकटिंग मध्ये करायचं ठरवलं. खूप स्ट्रगल करून जेव्हा तिला स्टार प्रवाह वरील “देवयानी” ही मालिकेत संधी मिळाली. तेव्हा तिचे आयुष्याचं बदलले.
या मालिकेत तिला लीड रोल करण्याची संधी मिळाली आणि या मालिकेमुळे ती प्रत्येक घरात पोहचली. या मालिकेनंतर शिवानीला खूप हिंदी मालिकेच्या ऑफर येऊ लागल्या. तिने 2011 मध्ये फुलवा या मालिकेत चंपा हिचा रोल केला.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागात सर्वाधिक चर्चेत अभिनेत्री “शिवानी सुर्वे” हिने प्रथमच आपल्या पडद्यामागची कथा मांडली आहे. एकेकाळी एका वेळच्या जेवणास महाग असणाऱ्या देवयानी हिने चार चाकी गाडी ते समुद्रापासून 15 मिनिटे अंतरावर असणारे घर घेऊन आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवास तिने ‘बिग बॉस’ मध्ये मांडला.
मित्रांनो तुम्हाला शिवानी सुर्वे हिच्या अभिनयाबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.