मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये राहुल्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याबद्दल बरेच काही!

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला मुळशी पॅटर्न चित्रपटातील राहुल्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्या बद्दल माहिती सांगणार आहोत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. शेतकरी,गुन्हेगारी,आणि पोलीस यांच्यावर आधारीत असणाऱ्या या चित्रपटातील संवाद देखील गाजत आहेत. विशेष म्हणजे तरुण वर्गाला हा चित्रपट खूप आवडला आहे. राहुल ची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. बॉक्स ऑफिस मध्ये या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. तर आज आपण राहुल्याची भूमिका साखारणारा अभिनेता “ओम भुटकर” विषयी जाणून घेऊयात.

ओम याचा जन्म पुणे येथे झाला. त्याने आपले शालेय शिक्षण पुण्याच्या अभिनय कॉलेज मधून पूर्ण केले. लहानपणा पासूनच त्याला अभिनयाची खूप आवड होती. म्हणून तो शाळेत असताना वेगवेगळया सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा. लहानपणी त्याने बॉलीवूड मधील ‘छोटा शिपाई’ या चित्रपटमध्ये बालकलाकार म्हणून खूप चांगली भूमिका साखारली होती. या फिल्म साठी बालकलाकार म्हणून त्याला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. नंतर ओम भुटकर  याने आपले महाविद्यालयीन शिक्षण  पुण्यातील  B.M. College of Commerce – Pune  मधून पूर्ण केले.

कॉलेज मध्ये असताना देखील तो सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा. लहानपणी छोटा शिपाई या चित्रपटात काम केल्यामुळे त्याने आपले  करिअर अभिनयात करायचं ठरवलं होतं. नंतर त्याने यशवंतराव चव्हाण , आजोबा, एक कप चहा, फास्टर फेणे, न्यूडआणि नाळ यासारख्या चित्रपटांत त्याने काम केले आहे. परंतु मुळशी पॅटर्न मुळे ओम ला विशेष अशी ओळख मिळाली आहे.

ओम भुटकर सारख्या मराठमोळ्या अभिनेत्याला Mahiti.in  या वेबसाईट कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा… मित्रांनो तुम्हाला ओम भुटकर यांच्या अभिनयाबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *