मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला सलमान आणि जुही यांच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का की सलमान ने जुहीच्या वडीलांकडे लग्नासाठी तिचा हात मागितला होता. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. जूही चावला ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की तीस वर्षांपूर्वी तिने मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले होते आणि त्यावेळी रेखाने त्यांना मुकुट घातले होते. 90 च्या दशकात त्यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि आजही त्या अनेक लोकांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत आहे.
जूही यांनी 1986 मध्ये ‘सल्तनत’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि तिचा हा चित्रपट सुपरफ्लॉप बनला होता. त्याच वेळी, या चित्रपटाच्या 2 वर्षानंतर, ती ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटात दिसली आणि तिचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरली होती. त्यानंतर तिला एका नंतर एक चित्रपट मिळत गेले आणि ती एक स्टार बनली. तिच्या दमदार अभिनयासाठी तिला नवख्या अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळी एक बातमीही आली होती, जी आता सर्वांनाच चकित करणारी आहे. होय, जेव्हा जूही लोकप्रिय झाली, तेव्हा सलमान एक नवीन अभिनेता बनला होता आणि तो जास्त प्रसिद्ध देखील झाला नव्हता, पण सलमानला जूही खूप आवडली होती.
सलमानला तेव्हा जूहीशी लग्न करायचे होते आणि त्यासाठी वडिलांना विषयी विचारण्यासाठी गेला होता. आणि ही गोष्ट स्वतः सलमान खानने सांगितली आहे. सलमानने एका मुलाखतीमध्ये हे मान्य केले आहे की, त्याला जुहीशी लग्न करायचे होते. आणि या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होत आहे. त्या व्हिडियो मध्ये सलमान खान असा बोलला आहे की, मी अभिनयाची सुरुवात करत असताना त्यावेळी मला जुही चावला ही अभिनेत्री प्रचंड आवडत होती. त्यामुळे तिच्याबरोबर लग्न करावे अशी इच्छा माझी इच्छा होती. मात्र जुहीच्या वडीलांनी नकार दिल्यामुळे माझे जुहीबरोबर लग्न झाले नाही.
‘जुही ही एक चांगली मुलगी आणि गुणी अभिनेत्री आहे. त्यामुळे ती एक उत्तम सुन आणि पत्नी होऊ शकते असे मला वाटले होते. त्यामुळे मी तिच्या वडीलांकडे लग्नासाठी जुहीचा हात मागितला होता. मात्र त्यांना अपेक्षित असलेल्या जावयाच्या चौकटीमध्ये मी बसत नाही, त्यामुळे त्यांनी मला नकार दिला’, असे सलमान खानने त्या विडिओ मध्ये सांगितले आहे.
मित्रांनो तुम्हाला जुही चावला यांचा अभिनय कसा वाटत होता ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.