मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अनशापोटी म्हणजे काहीही न खाता जर आपण गूळ आणि फुटाणे खाल्ले तर त्याचे कोणकोणते फायदे आपल्याला मिळु शकतात. या विषयी माहिती सांगणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. आताची तरुण पिढी, लोक मात्र साखरेकडे वळलेले आहेत आणि फुटाणे खाणे हे कमी पणाचे लक्षण लोकांना वाटू लागले आहे. गूळ आणि फुटाणे रिकाम्यापोटी खाल्ल्याने कोण कोणते फायदे होतात तर आपण पाहू.
गूळ आणि फुटाणे खाण्याचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘ऍनिमिया पासून बचाव’….!! ऍनिमिया हा एक असा आजार आहे जो शक्यतो स्त्रियांमध्ये ज्यास्त प्रमाणात आढळतो. या आजाराची लक्षणे म्हणजे थोडे जरी काम केले तरी देखील थकवा जाणवतो, दमल्यासारखे वाटते याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्याच्यामध्ये Hemoglobin चे प्रमाण कमी असते.
जे लोक लोहयुक्त आहार कमी घेतात, जे लोक आहार कमी प्रमाणात घेतात, त्या लोकांना ऍनिमिया चा त्रास जाणवतो आणि जर आपल्याला देखील अशी लक्षणे जाणवत असतील, तर आपण सुद्धा सकाळी उठल्यानंतर गूळ आणि फुटाणे नियमितपणे खात चला, कारण गूळ आणि फुटण्यांमध्ये आयर्न तर असतेच पण त्या बरोबर प्रोटीन सुद्धा असते. आणि यामुळे आपल्या शरीरातील Hemoglobin चे प्रमाण वाढते आणि तुमचा ऍनिमिया पासून बचाव होतो. तर हा आहे सर्वात मोठा फायदा गूळ आणि फुटाणे खाण्याचा.
पुढचा फायदा म्हणजे लठ्ठपणा वरती हा अतिशय गुणकारी आहे, कारण गूळ फुटाणे नियमित खाल्ल्याने तुमच्या शरीरातील Metabolism ची जी पक्रिया आहे ती गतिमान होते, परिणामी शरीरातील चरबी कमी होण्यास यामुळे मदत होते आणि लठ्ठपणावर प्रतिबंध घालता येतो. पूढील फायदा म्हणजे गूळ आणि फुटण्यांमध्ये फायबर्स चे प्रमाण चांगले आहे आणि म्हणून जर आपली पचन संस्था चांगली ठेवायची असेल, गॅसेस आणि ऍसिडिटी पासून आपला बचाव करायचा असेल तर त्यासाठी गूळ फुटाणे खायला हवेत. पुढचा फायदा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकणे, जे लोक गूळ आणि फुटनांचे नियमित सेवन करतात त्यांच्या शरीरातून विषरी पदार्थांचे उत्सर्ज चांगल्या प्रकारे होते आणि परिणामे पिंपल्स येणे ह्या ज्या समस्या असतात त्याच्या मध्ये कमतरता येते त्वचा तेजस्वी दिसू लागते एक प्रकारचा ग्लो चेहऱ्यावरती निर्माण होतो. आणि म्हणून सौंदर्यासाठी गूळ आणि फुटानांचे नियमित सेवन करायला हवे.
पुढचा मोठा फायदा म्हणजे स्मरण शक्ती वाढवण्यासाठी, गूळ आणि फुटनांनमध्ये ‘बी सिक्स’ नावाचे विटामिन असते आणि या ‘बी सिक्स’ विटामिन मुळे आपली ब्रेनची पॉवर वाढते मेंदूची क्षमता वाढते स्मरण शक्तिमध्ये वाढ होते. एकदा वाचलेले बरेच काळ लक्ष्यत राहते. आणि म्हणून जे विद्यार्थी दशेतील मुले आहेत किंवा ज्यांना बौद्धिक कामे जास्त असतात अश्या लोकांनी गूळ आणि फुटण्यांचे सेवन नियमितपणे करावे.
मित्रांनो हे आहेत गूळ आणि फुटाणे खाण्याचे फायदे, तुम्हाला यातील कोणता फायदा सर्वात जास्त आवडला ते कमेंट करून नक्की कळवा.
nice
सर हातावरील पांढरे चट्टे कमी करण्यासाठी काय करावे व ते का येतात ते plz सांगा.