मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला रस्त्यावरील दगडांचा रंग पिवळा, हिरवा, पांढरा, काळा का असतो ते जाणून घेणार आहे. आपण सर्व जण जेव्हा घराच्या बाहेर पडतो, तेव्हा रस्त्याकडेला खूप प्रकारची दगडे दिसतात. त्यावर गावचे नाव व किती किलोमीटर अंतर आहे. हे दर्शवले जाते त्याला आपण किलोमीटरचा दगड ही म्हणतो. पण तुम्ही असा विचार केला आहे का? ते दगड वेगवेगळया रंगानी काय दर्शवतात व प्रत्येक रंगाचा काय उपयोग आहे. या सर्व प्रकारची माहिती आपण घेणार आहोत.
रस्त्यावरील दगडांचा रंग पिवळा, हिरवा, पांढरा, काळा असे का असतात. याची माहिती आपण पाहणार आहोत, जेव्हा पांढरा व पिवळा रंग मिक्स असलेला दगड दिसतो. तेव्हा तुम्ही National Highway वर आहात.
पांढरा व हिरवा रंग मिक्स असतो. तेव्हा समजून जा की तुम्ही State Highway वरती आहात. जेव्हा हा रस्ता खराब असेल तर याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असते.
जेव्हा पांढरा व काळा रंग मिक्स असलेला दगड रस्त्याकडेला दिसत असेल तर समजून जा की तुम्ही मोठ्या शहराजवळ आहात. नारंगी व पांढरा दगड प्रधानमंत्री ग्रामसडक योजने खाली हे दगड लावले असतात अशा प्रकारचे दगड आढळल्यास समजून जा की तुम्ही ग्रामीण भागा कडे जात आहात लवकरच एक खेडे गाव भेटीस येणार आहे.