मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला आध्यात्मा विषयी थोडी माहिती सांगणार आहोत, सगळ्याना वाटत असते की त्यांची पर्स, पाकीट ही भरपूर पैशांनी भरलेले असावे. मेहनत करून देखील बर्याच वेळेस पाहिजे तेवढे धन आपल्याला प्राप्त होत नाही. ज्योतिष्यानुसार कुंडलीमध्ये जर ग्रहाची बाधा असेल तर व्यक्तीस गरिबी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते.लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी, पैसा प्राप्त करण्यासाठी, धन संपन्न आणि ऐश्वर्य संपन्न होण्यासाठी 21 तांदळाचे दाणे वापरून आपण कश्या प्रकारे धनवान, ऐश्वर्य संपन्न होऊ शकता याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे अक्षय तृतीया , पौर्णिमा , पाडवा , दसरा , अथवा दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून लाल रंगाचे रेशमी कापड घेऊन त्यात 21 तांदळाचे दाणे ठेवा. नंतर त्यांना लाल रंगाच्या कपड्या मध्ये एकत्र बांधून लक्ष्मी देवीची विधिवत पुजा करा. पूजेत लाल रंगाच्या कपड्यातील तांदूळ ठेवा. आणि पूजेनंतर लाल कापड्यात बांधलेले तांदूळ पाकीटामध्ये किंवा स्त्रियांनी त्यांच्या पर्समध्ये लपवून ठेवा. अशा प्रकारे पाकिटामध्ये तांदळाचे 21 दाणे ठेवल्याने आर्थिक अडचणींपासून सुटका होण्यास मदत होईल.
मित्रांनो पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि आपण नक्कीच धन संपन्न आणि ऐश्वर्य संपन्न होऊन जाऊ.