नीरजा भनोट मुंबईतील पैन एम एअरलाइन्सच्या क्रू मेंबर होत्या. 5 सप्टेंबर 1986 रोजी पैन एम विमानात 73 प्रवाशांना मदत व संरक्षण करताना ती दहशतवाद्यांच्या गोळीची ब ळी ठरली. 2016 साली त्यांच्या बहादुरीविषयी ‘नीरजा’ हा चित्रपट बनला आहे. ज्यामध्ये त्याची भूमिका सोनम कपूरने साकारली होती. मी आपणांस सांगतो की, त्यानी दहशतवाद्यांपासून सुमारे 400 प्रवाशांचे प्राण वाचवले आणि ते करताना वयाच्या २३ वर्षी शहीद झाली..ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हाे वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरली.. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, त्यांनी प्रवाशांचे प्राण कसे वाचवले.
नीरजाचा जन्म 7 सप्टेंबर 1963 रोजी चंदीगडमधील पंजाबी कुटुंबात झाला होता. ती रमा भानोत व हरीश भानोत यांची मुलगी. हरीश हे मुंबईमधले एक पत्रकार होते. चंडीगडच्या सेक्रेड हार्ट सीनियर सेकंडरी स्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर त्याचे कुटुंब मुंबईला गेले. वयाच्या 22 साव्या वर्षी मार्च १९८५ मध्ये तिचे लग्न झाले व ती तिच्या पतीसोबत गल्फमध्ये स्थायिक झाली होती. पण हुं ड्याच्या दबावामुळे ती दोन महिन्यांतच माहेरी मुंबईला परत आली. नंतर तिने पॅन ॲम कंपनीत विमान परिचारिकेसाठी अर्ज दिला. निवड झाल्यानंतर ती काही काळ मायामी येथे प्रशिक्षणासाठी गेली व नंतर पॅन ॲममध्ये खानपान सेविका म्हणून दाखल झाली.
नीरजाला पॅन एम एअरलाइन्समध्ये एअर होस्टेसची नोकरी मिळाली. पण कुणालाही वाटले नाही की या नोकरीमुळे त्यांना एक दिवस त्यांच्या जीवनाला निरोप द्यावा लागेल. 5 सप्टेंबर 1986 तो दिवस होता. पॅन एम 73 विमान पाकिस्तानच्या कराचीमधील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्या पायलटची वाट पाहत होता. विमानात सुमारे 400 प्रवासी बसले होते. अचानक Pan Am 73 एयरलाइन्सच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले.. विमानात पायलट लवकरात लवकर पाठवावा यासाठी त्यांनी पाकिस्तान सरकारवर दबाव आणला, परंतु पाकिस्तान सरकारने नकार दिला. त्यानंतर दहशतवाद्यांनी नीरजा आणि तिच्या साथीदारांना बोलावून सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा केले, त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देऊन पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. त्यानंतर नीरजाने सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा केले. त्याचवेळी विमानात बसलेल्या 5 अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवून ते सर्व दहशतवाद्यांना दिले. हळूहळू 16 तास निघून गेले. पाकिस्तान सरकार आणि दहशतवाद्यांमधील चर्चेचा कोणताही निकाल लागला नाही.
जेव्हा नीरजा अंधाराची वाट पहात होती
नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरू केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यांपर्यंत पोहोचविले. नीरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या. अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती.
आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अति रेक्यांपैकी तिन जणांना मारून टाकले. जेव्हा ती त्या मुलांना वाचविण्यासाठी त्यांच्याकडे गेली तेव्हा चौथ्या दहशतवाद्याने तिच्या छातीवर अनेक गोळ्या झाडल्या पण नीरजाने आपत्कालीन दरवाजावरून मुलांना ढकलले आणि स्वतःचे शौर्याचे उदाहरण म्हणून जग सोडून गेली. त्यानंतर पाकिस्तानी कमांडोने चौथ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला पण नीरजाला वाचवता आले नाही.
भारताने नीरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हा सर्वोच्च पुरस्कार दिला. मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.
Very brave air hostage