ज्वारीची भाकरी खात असाल तर एकदा ही माहिती वाचाच…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला ज्वारी खाल्ल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात ते सांगणार आहोत, आपल्या पैकी बऱ्याच जणांना ज्वारी विषयी माहीत देखील नसेल आणि याचे कारण असे आहे की पूर्वी आपल्या आहारामध्ये ज्वारी ही असायची आपण ज्वारीची भाकरी खात होतो बाजरीची भाकरी खात होतो पण आजकाल आपण गव्हाचे अन्न ज्यास्तीत ज्यास्त खातो ज्वारी आणि बाजरी फक्त नावालाच उरली आहे. खरेतर ही जी ज्वारी आहे ही ज्वारी खाण्याचे अनेक फायदे आहेत.

ज्वारीचा जो सगळ्यात पहिला आणि मोठा फायदा असा आहे की, जे ज्वारी खातात अश्या लोकांना Blood pressure आणि हृदयाशी संबंधित आजार हे होत नाहीत, म्हणजेच त्यांचे हृदय चांगले राहते आणि त्याचे कारण असे आहे की Potassium आणि Magnesium चे प्रमाण भरपूर आहे. तसेच यामध्ये जे Minerals आहेत त्यामुळे आपले Blood pressure म्हणजे बी.पी. कंट्रोल मध्ये राहतो. आजकाल प्रदूषण देखील वाढले आणि आणि तसेच आपले जीवन देखील दगदगिचे  बनले आहे आणि याचा सर्वात मोठा फटका हा महिलांना बसला आहे. आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत मग त्यामध्ये गर्भाशयाच्या ज्या समस्या आहेत किंवा प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात. तर या गोष्टींचे निधान होण्यासाठी किंवा या गोष्टी होऊ नये, एकंदरीत त्यांचे आयुष्य चांगले राहावे यासाठी ज्वारी मदत करते.

या ज्वारी मध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ देखील आहेत, जे आपले पोट साफ करण्यास मदत करतात. म्हणून जर तुम्हाला ऍसिडिटी चा त्रास असेल पचन व्यवस्थित होत नसेल अपचनाचा त्रास असेल. तर मित्रांनो चपाती सोडूनद्या आज पासून आहाराममध्ये ज्वारीची भाकरी समाविष्ट करा. याच बरोबर यामध्ये लोहाचे प्रमाण देखील आहे. पहा किती मोठे फायदे आहेत लोह भरपूर आहे आणि म्हणून ज्यांना पंडूरोग, ॲनिमिया (थोडे जरी काम केले की थकवा येतो) याचा त्रास आहे अश्या लोकांनी ज्वारीची भाकरी अवश्य खा, यामुळे ॲनिमियाचा त्रास निघून जातो.

ज्यांना मधुमेह आजे डायबिटीज आहे अश्या लोकांसाठी ज्वारी तर वरदान आहे. कारण ज्वारी खाल्ल्याने आपल्या शरीरातील Insulin ची जी लेवल आहे ती कंट्रोल मध्ये राहते आणि म्हणूनच मधुमेह आणि डायबिटीज जे रुग्ण आहेत. त्यांच्याकरिता हा एक चंगला उपाय आहे. ज्वारीचे सेवन केल्याने आपल्या रक्तवाहिन्यातील जी Cholesterolची level आहे देखील ही ज्वारी नियंत्रणात ठेवते. म्हणून आपण ज्वारी नक्की खायला हवी. आणि शेवटचा फायदा म्हणजे असा की ज्वारीमध्ये जे पोषक तत्वे आहेत ती किडनी स्टोन होऊ देत नाहीत म्हणून तुम्हाला जर असा त्रास असेल किंवा होऊ नये वाटत असेल तर तुमच्या आहारात ज्वारीचा समावेश नक्की करा.
मित्रांनो हे थोडेसेच फायदे तुम्हाला आम्ही सांगितले आहेत आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.

5 Comments on “ज्वारीची भाकरी खात असाल तर एकदा ही माहिती वाचाच…”

  1. उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  2. ज्वारी ची भाकरी चटणी आणि कांदा हे आपले मूळ जेवण आहे फायदे होतेच आपण आजकाल जुने पुराणे विसरून गेलोय पण परत तेच येतेय माहिती नवीन पिढीला करून देणे गरजेचे आहे ते जास्त ऑनलाईन माहितीवर विश्वास ठेवतात त्यामुळे आपण ज्वारी वरती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !🙏🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *