मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधील अशा काही अभिनेत्यांबद्दल संगणार आहोत ज्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात करण्यापूर्वी ते खूपच गरीब होते. त्यांना घर चालवणे खूप कठीण होते, परंतु आता हेच कलाकार चित्रपटांमध्ये त्यांच्या कष्टाच्या जोरावर सर्वात मोठे सुपरस्टार बनले आहेत, आणि त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमुळे कोट्यावाढीचे मालक देखील बनले आहे. तर चला मित्रांनो आपण त्या अभिनेत्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
1. रजनीकांत : रजनीकांत यांना भारताचा सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून मानले जातो,त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्याप पर्यंत काम केलेले नाही. परंतु त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्या अगोदर रजनीकांत यांची परिस्थिती खूपच गरीब होती. ते आपल्या कुटुंबातील घरखर्च चालविण्यासाठी बस मध्ये कंडक्टर म्हणून काम करत होते. चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर, रजनीकांत यांना त्यांच्या शैलीमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी द बॉस’ या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले.
2. नवाजुद्दीन सिद्दीकी :- नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी बॉलीवुडमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट केले आहे. स्ट्रगलच्या काळात त्यांनी केमिस्टच्या दुकानात देखील काम केले होते, रस्त्याच्या कडेला धन्य देखील विकत होते आणि तेवढेच नव्हे तर त्यांनी चौकीदार म्हणूनही नोकरी केली आहे.त्यांनी सण 1999 साली आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या “सरफरोश” पासून बॉलिवूडमध्ये अभिनय केला होता. यानंतर त्यांनी राम गोपाल वर्माच्या “शूल” (1999), जंगल (2000) आणि राजकुमार हिरानी यांच्या मुन्ना भाई एमबीबीएस (2003) मध्ये देखील दिसले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये देखील काम मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसे यश मिळाले नाही. या नंतर त्यांनी इरफान खानबरोबर “द बायपास” (2003) या एका लहान चित्रपटात काम केले. 2002 ते 2005 पर्यंत बहुतेक त्यांच्याकडे काम नव्हते.
3. अक्षय कुमार : अक्षय कुमार बॉलीवुड मधील एक उत्कृष्ट अभिनेता आहे. आणि बॉलीवुडच्या प्रसिद्ध 5 कलाकारांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, अक्षय कुमार हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होते. त्यामधून साधारणपणे 1500 रूपयांची कमाई होत होती. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात कामे केली आहेत. त्याशिवाय अक्षय कुमार हे कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहेत, आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी देखील आहेत. त्यामुळेच चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी दूरचित्रवाहीणीवर ‘खतरोंके खिलाडी’ आणि ‘अमुल मास्टर शेफ’ यांसारखे कार्यक्रम आलेले आहेत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.