ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी घरगुती उपाय शोधताय? येथे ९ प्रभावी उपाय दिलेले आहेत…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी आवश्यक टिप्स देणात आहोत, तर चला मित्रांनो या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. वाढते वय, हार्मोन्स मध्ये होणारा बदल, आणि स्किन पोर्च यामुळे चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली काळ्या डागांची समस्या सुरू होते. हे डाग ज्यास्त दिसत असतील तर त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, मात्र ते हलकेसे दिसू लागले असतील तर घरच्या घरी नियमित पणे फक्त दहा मिनिटांच्या उपायांनी ते दूर होऊ शकतात.

१) गुलाब पाणी, आणि मीठ एक एक चमचा घेऊन त्या मिश्रणाने काळ्या डागांवर हलक्या हाताने मसाज करावा, दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुऊन टाकावा. तुम्हाला नक्कीच परिणाम दिसेल. २) एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ एकत्र करावं ते काळ्या डागांवर हलक्या हाताने लावल्या नंतर 5 मिनिटांनी कॉटनच्या ओल्या फडक्याने साफ करून घ्याव. ३) एक चमचा बेसन चे पीठ घेऊन त्यात दोन चमचे दूध आणि चिमूटभर मिसळावे आणि हे मिश्रण चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स वर लावावे. त्यानंतर दहा मिनिटांनी हे मिश्रण चोळून साफ करावं, चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स नक्की कमी होतील.

४) लिंबाचा रस ब्लॅकहेड्स वर लावून मसाज करावा दोन मिनिटांन नंतर त्यावर मीठ लावून हलक्या हाताने पुन्हा मसाज करावा, आणि त्यानंतर पाच मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा, त्यामुळे तुमचा चेहरा नक्कीच स्वच्छ होईल. ५) अर्धा चमचा दही घेऊन त्यात काळी मिरचीची पूड मिसळावी, हे मिश्रण ब्लॅकहेड्स वर लावून हलकासा मसाज करावा. दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यासाठी नक्की उपयोग होईल. ६) अर्धा कप पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट बनवावी या पेस्ट ने 5 ते 8 मिनिटे ब्लॅकहेड्स वर मसाज करावा चेहऱ्यावर ही पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाकावी. पाणी आणि बेकिंग सोडा केलेली ही पेस्ट  फेसपॅक सारखी काम करेल आणि तुमचा चेहरा नक्कीच स्वच्छ होईल.

७) एक चमचा दालचिनीची पूड घेवून त्यात लिंबाचा रस आणि हळद एक एक चमचा मिसळावा या मिश्रणाने ब्लॅकहेड्स मालिश करावी 5 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. ८) 1 चमचा मधाने ब्लॅकहेड्स वरती 5 ते 10 मिनिटे मसाज करावी, काहीवेळाने चेहरा धुवून टाकला की लगेच तुम्हाला परिणाम दिसेल. ९) हळद आणि पुदिनाचा रस प्रत्येकी दोन दोन चमचे घेऊन त्याची पेस्ट बनवावी या पेस्ट ने 5 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा, काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा.

चेहऱ्यावरील काळे डाग हे बऱ्याचदा ब्लॅकहेड्स मुळे ज्यास्त प्रमाणात दिसतात त्यामुळे चेहऱ्यावरचे हे ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी असे काही घरगुती उपाय नक्कीच करून बघा. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *