देशातील आणि राज्यातील किंगमेकर म्हणून उदयास आलेले नाव म्हणजे शरद पवार. राजकीय क्षेत्रात हे नाव अतिशय महत्वाचा आणि आदराने घेतले जाणार नाव आहे. गेले 50 हुन अधिक वर्ष ते राजकारणात आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री ते देशाचे कृषिमंत्री पद असे अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याची अचूकता बऱ्याच लोकांमध्ये असते. म्हणूनच आपण आज त्यांच्या तिसऱ्या पिढीतील एक सदस्यांविषयी जाणून घेणार आहोत, ते म्हणजे युवा नेतृत्व रोहित पवार. चला तर जाणून घेऊयात रोहित पवार यांच्या विषयी.
रोहित पवार हे शरद पवार यांचे चुलत नातू आहेत. रोहित पवार यांच्या जन्म 29 सुप्टेंबर 1985 मध्ये बारामती येथे झाला. त्यांचे वय 34 वर्ष आहे. त्यांच्या वडिलांचे नाव राजेन्द्र पवार तर,आईचे नाव सुनंदा पवार असे आहे. त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथील विदयाप्रतिष्ठान येथून झाले. ज्युनिअर कॉलेज त्यांनी पुण्यातुन पूर्ण केलं आहे. पुढे त्यांनी मुबई युनिव्हर्सिटी तुन व्यवसथापन या विषयातून शिक्षण पूर्ण केलं आहे.
रोहित पवार यांचा विवाह झाला असून, त्यांच्या पत्नीचे नाव कुंती मगर असे आहे. त्यांच्या पत्नी हडपसर च्या आहेत. त्यांना दोन मुलं देखील आहेत. आनंदिता रोहित पवार अस मुलीचं शिवांश रोहित पवार अस मुलाचं नाव आहे. उच्य शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2007 पासून त्यांच्या बिसनेसमध्ये लक्ष्य घालण्यास सुरुवात केली. त्यांनी या कंपनी मध्ये लक्ष्य घातल्यानंतर कंपनी ची चांगली ग्रोथ होऊ लागली. त्यामुळे त्यांनी बारामती ऍग्रो या कंपनीचा CEO करण्यात आलं. त्यामुळे त्यांची यशस्वी उधोगपती असे नाव लोकांत आले.
त्यानंतर त्यांनी सामाजिक कामे करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांचे प्रश्न युवा युवतींचे प्रश्न घेऊन ते सोडवण्याचा खूप प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक कार्य करत असताना ते राजकारनाकडे वळाले. तशी त्यांना खूप मोठी राजकीय गादी आहे. सुप्रियाताई सुळे,अजित पवार,रोहित पवार असे बरेच मोठी नावं त्यांच्या घरात आहेत. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारनाला सुरुवात केली. रोहित पवार यांनी पहिली निवडणून जिल्हा परिषद मधून निवडली. आणि ते विजयी सुद्धा झाले. रोहित पवार हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी चे स्टार प्रचारक म्हणून पुढे होते. व त्यांनी कर्जत जामखेड या मतदारसंघातुन विजय मिळवला आहे. यांच्या विरुद्ध bjp चे आमदार आणि पालकमंत्री राम शिंदे होते.