मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला राणू मंडल यांच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहोत. पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन पोट भरणारी रानू मंडल ही एक अशी व्यक्ती आहे. ज्यांना त्यांच्या नशीबामुळे रेल्वे स्थानकातून थेट बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळाला होता. रानू मंडल काही दिवसापूर्वी गायलेल्या गाण्यामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या. रानू मंडल यांनी लता मंगेशकर यांच्या गाण्याचा गायलेला व्हिडिओ संपूर्ण देशभर ट्रेंड झाला होता.
बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांनी रानू मंडलच्या गायनाने प्रभावित होऊन राणूला आपल्या चित्रपटात मुख्य महिला गायिका म्हणून गाण्याची संधी दिली. त्या गाण्याचे देशभरात खूप कौतुक झाले आणि त्यानंतर राणू यांचे संपूर्ण आयुष्यचे बदलले.
तुम्हाला समजल्यावर आश्चर्य वाटेल की रानू मंडल ह्या बरेच काम करत आहेत. आता त्यांचे वैयक्तिक फेसबुक पेज तयार केले गेले आहे. ज्यावर त्यांच्याविषयी नियमितपणे माहिती दिली जात आहे. वास्तविक, सध्या रानू मंडल यांचे बायोपिकवर काम सुरू आहे. त्यात रानू खूप व्यस्त आहेत. त्यादरम्यान, यांनी आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य स्ट्रगल आणि रेल्वे स्टेशनवर गाण्यात घालविले आहे. त्यांनी थोड्याच दिवसांपूर्वी आपला पासपोर्ट देखील मिळवला आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.