परळीतून ‘या’ मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का, EXIT POLL चा निकाल!

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आपण पोल चा निकाल पाहणार आहोत. आज मतदान पार पडल्यानंतर संस्थांनी केलेल्या अनेक मतदाणोत्तर चाचणीत वेगवेगळा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पूर्व नुसार धनंजय मुंडे यांचे पारड जड असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पंकजा मुंडे यांचा पराभव होणार आहे. परळी मतदार संघ जास्त गाजला तो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावा मुळेच…

दोघांमध्येही कठोर टक्कर पाहायला मिळते पण अश्यात पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परळी मध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीतपंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी मध्ये कोणतीही निवडणुक असली तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सामना पाहायला मिळतो. 2016 मध्ये झालेल्या परळी नगर पालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या गटाने बाजी मारली. पंकजा मुंडे मंत्री असतानाही परळी नगर पालिकेत पंकजा मुंडे सत्ता आणू शकल्या नाहीत, याची त्यावेळी खूप चर्चा झाली. यानंतर बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही हाच संघर्ष पाहायला मिळाला. मात्र भाजबच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघात 19 हजारांचे मताधिक्य मिळालं.

पंकजा मुंडे या ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री असूनही त्यांनी चांगली कामे केली नाहीत. असा आरोप विरोधकांकडून केला गेला. परळी विधानसभा मतदार संघातल्या विकास कामासाठी त्यांनी भरीव निधी आणला नाही. असा देखील प्रचार धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आला. तसेच इथली निवडणूक ही विकास कामांच्या मुद्द्यांवर कमी तर भावनीक मुद्यांवर ज्यास्ती लढवली जाते. हे आता परळीतील जनतेच्या लक्षात आले, असल्याचा फायदा देखील धनंजय मुंडे यांना होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे इथून धनंजय मुंडे यांचा विजय होणार असल्याची चिन्ह आहेत, याबाबत तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *