मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला झी मराठी वाहिनीवरील चालू असणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील बाबन्याची भूमिका साकारणाऱ्या कलाकारा विषयी माहिती सांगणार आहोत. तर चला मित्रांनो त्याच्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळताना दिसत आहे. मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात विशेष म्हणजे या मालिकेतील “अतरंगी बबन्या” हे कॅरेक्टर प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे.
ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. ह्या कलाकाराचे नाव आहे “रोहित चव्हाण”….!! रोहित हा मूळचा कराड मधील “इंगरोळे” गावचा तिथेच त्याने प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर इंदोली मधील “सद्गुरू गाडगेमहाराज कॉलेज, कराड” इथे त्याने उच्च शिक्षण पूर्ण केले. उच्च कलागुण अंगी असणाऱ्या रोहित ने कॉलेजमध्ये सलग तीन वर्षे सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवली. याच कलेतून स्टुडिओमध्ये बाळकृष्ण गायकवाड यांच्या सहकार्याने वाणीमुद्रन करण्याचे काम त्यांना मिळाले. कराड येथील अरुण कचरे यांच्या बळीराजा या अलबम मधून अभिनयाची सुरुवात त्याने केली. तर काळूबाईच्या नावाने चांगभलं या चित्रपाटातून मोठया पडद्यावर झळकण्याची संधी त्याला मिळाली.

झी मराठी वरील हास्य सम्राटचे दुसऱ्या पर्वाचे उपविजेते पद त्याने पटकवले. ते कलर्स मराठीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि सोनी मराठी वाहिणीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचून, आपल्या अतरंगी अभिनयाचे रसिकांची व्हा व्हा देखील त्याने मिळवली. बॉईज 2, झाला बोंबाटा, जोगवा, पांगीरा, सुपरस्टार, बळीराजाच राज्य येउ दे, बाबा लगीन, चूक भूल, यांसारख्या अनेक चित्रपटात विविध अंगी भूमिका साखरण्याची संधी त्याला मिळाली जवळपास पन्नास हुन अधिक चित्रपटात काम करूनही आपले पाय जमिनीवरच ठेवणारा रोहित रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण व्हावे, यासाठी आजही आहो रात्र मेहनत घेताना दिसतोय.
रोहितला असेच यश मिळत राहो या साठी त्याच्या पुढील वाटचालीला आमच्या mahiti.in या वेबसाईट कडून खूप खूप शुभेच्छा….!! मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करू आम्हाला नक्की कळवा.