मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात व त्या मागे कोणती कथा आहे ते सांगणार आहोत. तर चला मित्रांनो या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
शरद ऋतूतील अश्विन महिना आणि अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमा म्हणजेच “कोजागिरी” पौर्णिमा किंवा या पौर्णिमेला शरद पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते.
मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा, म्हणजे कोजागरती म्हणजेच कोण जागे आहे कोण जागरूक आहे असे विचारीत दुर्गादेवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ती, बुद्धीच्या देवतांची आराधना करावी. विजया दशमीला विजया संपादणासाठी शिंमलंगण करावे, त्यानंतर येणारी ही पौर्णिमा शेतीतील कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला काही भागात नवीन पिके हाताशी आलेली, अनेक भागातील ही नवरात्र पौर्णिमा या दिवशी प्रत्येक कुटुंबातील जेष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गोष्टी गप्पा करत, आठवणीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून त्यात बदाम, केसर, पिस्ता इत्यादी घालून सुका मेवा घालून दक्षिणेला नैवद्य दाखवला जातो. आणि ते मसाला दूध रात्री प्राशन केले जाते, रात्री चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सर्व पृथ्वीला न्हाऊन घालत असतो.

कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत त्यातील एक, अशी सांगितले जाते की, एकदा एक राजा आपले सर्व वैभव, संपत्ती गमावून बसतो। त्याची राणी महालक्ष्मीचे वृत्त करते आणि महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राज्याचे वैभव त्याला परत मिळते. असे म्हणतात की महालक्ष्मी मध्य रात्री या चंद्र मंडल भागातून उतून खाली पृथ्वीवर येते. आणि ती चांदण्याच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन प्रत्येकालाच बोलते कोण जागे आहे का, जागे आहे का आणि तिच्या हाकेला साथ द्यायला सगळे जागे राहतात मग ती तिची वाट पहणाऱ्या सर्वांना ती अमृत म्हणजेच लक्ष्मीचे वरदान देते. धन धान्य आणि सुख समृद्धी, दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते दूध पिल्याने पित्त थोडे कमी होते आणि याच कारणाने पोर्णिमेच्या रात्री मसाले दूध पिण्याची प्रता आहे.
मित्रांनो आम्ही अशा करतो की तुम्हाला ही महिती नक्की आवडली असेल