मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती…..!! मित्रांनो काश्मीर व्याधीत सर्वांसाठी मोबाईल नेटवर्क, इंटरनेट बंद आहे, येवढेच काय तर भारतीय सैनिकांसाठी सुद्धा आहे. मित्रांनो ही सत्य घटना आहे, एक आर्मीतील जवान रात्री ड्युटी संपल्यानंतर काश्मीर मधील व्हाजाबाग बारामुल्य एरियात ATM मध्ये जाऊन 100 रुपये त्याने काढले, व्यवस्तीत ते 100 रुपये पाकिटामध्ये ठेवले व बाहेर पडला.
दुसऱ्या दिवशी हेच केलं, ATM मधून पैसे काढले व्यवस्तीत पाकिटामध्ये ठेवले व बाहेर पडला, अस काही दिवस चाललं होतं. ATM च्या बाहेरील security guard त्याला रोज पाहायचा, त्या सैनिकांची रोजची अशी कृती पाहून त्याला आधी कीव आली नंतर त्याला त्याची शंका यायला लागली, नंतर नंतर त्याला त्याची भीती वाटू लागली, त्याला वाटू लागलं हा काही तरी उलट-सुलट काम तरी करत नाही ना…..!! माणूस तर आर्मीच्या दिसतोय म्हणून तो काही विचारायला बिचकत होता तसही तिथे रात्रीची वर्दळ खूप कमी असते पण त्याला काही चैन पडेना एक दिवस काही स्थानिक लोक जवळपास होती म्हणून त्याने धीर केला, काही झाले तर ती माणसे आपल्यासाठी धावून येतील असा विचार करून त्याने त्या आर्मीच्या माणसाला थांबवलं.

हालकेच, अदबीन व आदराने विचारलं, “साहेब तुम्ही रोज येता फक्त 100 रुपये काढता रोज इतक्या दुरून यायचं लाईन लावायची आणि फक्त 100 रुपये काढायचं इतका त्रास करण्यापेक्षा एकदाच पाहिजे तेवढे पैसे का नाही काढत?” ते ऐकून त्या आर्मीच्या सैनिकाने डोक्यावरून हात फिरवला आपली वर्दी ठीक ठाक केली, त्यावेळेस तो खूप दमलेला दिसत होता पण खंबीर दिसत होता. त्याने शांत पणे उत्तर दिलं, “मी जेव्हा पैसे काढतो तेव्हा त्या काढलेल्या पैश्याचा जो मेसेज येतो तो माझ्या पत्नीच्या फोनवर जातो कारण माझे अकाऊंट तिच्या फोनला लिंक आहे आणि तिला समजतं की मी अजून जिवंत आहे”…..!!
असे हे आयुष्य आपल्या वीर जवनांच आहे, आणि काळजीनं व्याकुळ होणाऱ्या त्यांच्या आई, पत्नी व सर्व कुटुंब आहे भारतातील प्रत्येक जवानांना mahiti. in या वेबसाईट कडून मानाचा मुजरा….!!
मित्रांनो तुम्हाला आपल्या जवानांच्या बद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा….! जय हिंद……..!! जय महाराष्ट्र……!!