मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा नदीबद्दल सांगणार आहोत जी उलट दिशेने वाहते, तर चला मित्रांनो त्या नदी बद्दल अधिक जाणून घेऊ. तुम्हाला माहीतच असेल की भारताचा उतार (ढळान) पश्चिम दिशेपासून पूर्व दिशेकडे आहे, ज्यामुळे भारताच्या सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.
परंतु आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशाच एका नदीबद्दल सांगणार आहोत जी या प्रवाहाच्या उलट वाहते अर्थात ती पूर्वेकडून सुरू होऊन पश्चिमेस वाहते. ती भारताच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे असणारा उतार (ढळान) याच्या उलट दिशेने वाहते, तर कोणती आहे ही नदी? चला जाणून घेऊया….!! त्या नदीचे नाव आहे”नर्मदा नदी”, या नदीला मध्य प्रदेशची “जीवनरेखा” असे देखील म्हटले जाते. ही नदी मध्य प्रदेशच्या अगदी मध्य भागातून वाहते. या नदीचे उगमस्थान अमरकंटक हे आहे आणि ही नदी मध्य प्रदेश व गुजरातमधून वाहत खंभातच्या खाडीत जाऊन मिळते.

पुराणात नर्मदेला भगवान शिव यांची कन्या मानले जायचे. ‘नर्मदा पुराण’ या नावाने एक पौराणिक (पुराण) कथा देखील आहे, म्हणूनच नर्मदा मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये गंगेपेक्षा ज्यास्त पवित्र मानली जाते. असे मानले जाते की ज्येष्ठ महिन्यातील गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा जी स्वत: नर्मदा स्नान करण्यासाठी मानवी रूपात येतात.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा…..!