विधवा महिलेचे दुकान एका भ्रष्ट अधिकाऱ्याने पाडले तेव्हा विलासरावजी देशमुख यांनी पहा काय केले होते !

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला एक घटना सांगणार आहोत, जेव्हा महिलेचा दुकान एका भ्रष्ट अधिकाऱ्याने पडले हे जेव्हा विलासरावजी देशमुख साहेबांना समजले तेव्हा त्यांनी काय केले. चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊ ती गोष्ट…….!! मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाज्याशी तटकळताना दिसायची.

पोलीस तीला मागे ढकलायचे संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार एक दिवस गाडी पोर्चमध्ये शिरताच त्यांनी फर्मान सोडले, “त्या पिवळ्या लुगड्यातल्या बाईंना माझ्याकडे घेऊन या”, मुख्यमंत्र्यांच्या दालनात तिला आंतच, त्यांनी विचारले “बाई तुम्ही रोज का उभ्या असता?, तुमचे काय काम आहे.?” थरथरत्या हाताने फाईल पुढे करत त्या बाईने एका दमात आपली कथा त्यांना ऐकवली, एका सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ती विधवा पत्नी होती. पतीच्या निधनानंतर वरळीसीपेस जवळच्या कर्मचारी वसाहतीमधील कम्पाउंड जवळ तिने कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या मिळकतीवर तिच्या किटुंबाची गुजरण चालू हाती. पण त्यावर कुना अधिकाऱ्याची नजर गेली आणि हप्ता मागण्यास सुरुवात झाली. ती महिला मुकाट्याने हप्ता देत राहिली. पण पुढे पुढे ही रक्कम इतकी फुगत चालली की तिला ते देणे पर्वडेनासे झाले. तिने वाढीव हप्त्याला नकार देताच तिची टपरी अनिधीकृत बांधकाम म्हणून पडून टाकण्यात आली.

तिची इस्त्री ही जप्त झाली. फी भरायला पैसे नाहीत, म्हणून मुलांचे शिक्षण थांबले, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली. तिची कथा ऐकून विलासराव स्थाब्द झाले, यांचे डोळे पाणावले, त्यांनी त्या महिलेला बसून घेतले, तिच्या चहाची व्यवस्था केली, आणि थेट सार्वजनिक बांधकाम सचिवांना निरोप धाडला. असाल तसे निघून या तुमच्या खात्याची कर्तबदरी आणि कार्यक्षमता दाखवायची आहे. निरोपाची गांभीर्य लक्षात येताच बावचळलेले सचिव आले, संतापलेले विलासराव सचिवास बोलले तिथल्या तिथे त्यांनी आदेश दिला, “या महिलेची टपरी जिथे होती तिथे उभारून द्या, तिची इस्त्री परत करा….!!” हे सारे संध्याकाळी मी घरी जायच्या आत व्हायला पहाजे. आणि उद्या तिथल्या त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला माझ्या समोर उभे करा, माझी कर्तव्यदक्षता त्यांना दाखवून द्यायची आहे, येताना त्याला घराचे सामान आवरूनच यायला सांगा, त्यांना कुठे पाठवायचे ते मी ठरवले आहे. सचिवांची काळण उडाली, विलासरावांच्याच गाडीतुन तिला वरळीसेपेसला सोडण्यात आले.

संध्याकाळी मंत्रालयातून निघण्यापूर्वी विलासरावांनी त्या सचिवाला पुन्हा बोलून घेतले आणि त्यांच्या समवेतच ते वरळीसेपेसला शासकीय वसाहतीत गेले, टपरी पुन्हा उभी राहिली होती, तिच्यात एका स्टुलवर बसून विलासरावांनी चहा घेतला, आता तिच्या डोळ्यातून आनंदअश्रू वाहत होते स्वतःच्या रुमालाने विलासरावांनी ते पुसले आणि घरी निघून गेले. आपण जे केले त्याची चार ओळीची बातमी यावी अशीही त्यांची अपेक्षा न्हवती, उलट काही छापू नका असा प्रेमाचा सल्लाच त्यांनी दिला. मित्रांनो अश्या या प्रेमळ स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांना mahiti.in या आमच्या वेबसाईट कडून मानाचा मुजरा, मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *