असे ठरले होते शरद पवारांचे लग्न,…मोठे भाऊ म्‍हणाले होते- माझा भाऊ रिकामटेकडा…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला शरद पवार साहेबांच्या लग्नाची गोष्ट सांगणार आहोत त्यांचे लग्न कसे व कोणी केले ते आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो जाणून घेऊ…..!!
राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट घडली की त्या पाठीमागे शरद पवारा साहेबांचा हात असेल असा एक अलिखित नियमच आहे. मात्र शरद पवार यांच्या लग्नाची गाठ बांधण्यासाठी शरद पवारांचा नाही तर पवारांच्या जेष्ठ बांधूनचा हात होता. मुलगा काहीही करत नाही अर्थात रिकाम टेकडा आहे, अस खुद्द शरद पवार यांच्या बंधूनी मुलीकडच्या मंडळींना सांगीतले आहे. बघूया शरद पवारांच्या लग्नाची ती अनोखी गोष्ट….!!

शरद पवारा यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांचा जन्म कोणत्याही महानगरामध्ये किंवा एकाद्या मोठ्या शहरामध्ये झाला नाही. एका सामान्य कुटुंबामध्ये शरद पवार यांचा जन्म झाला. शरद पवार यांच्याकडे त्यांचे समकालीन असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे वकृत्व देखील न्हवतं. पवारांच्या सभेला फारशी गर्दी देखील नसायची, आणि जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते देखील शरद पवार यांच्याकडे न्हवते. मात्र केवळ आपली दूरदृष्टी, शांत आणि सय्यमी स्वभाव याच्या बळावर महाराष्ट्रतच न्हवे तर देशाच्या राजकारणात शरद पवार हे एक मायलाच दगड बनले आहेत. चळवळी पासून चलू झालेले शरद पवार यांचे राजकारण एकाद्या राष्ट्रीय पक्ष्याच्या संस्थापक अध्यक्ष पदापर्यंत जाऊन पोहोचलं. आणि 1 अगोस्ट 1967 रोजी शरद पवार आणि प्रतिभा ताई यांचा बारामरी येथे विवाह समपन्न होता.

प्रतिभा ताई ह्या पुण्यामधील सदू शिंदे या प्रसिद्ध क्रिकेटपटू यांची कन्या. प्रतिभाताई ह्या गेल्या 5 दशकापासून शरद पवार यांना पावलो पावली साथ देत आल्या आहेत. शरद पवार यांचे मोठे बंधू बापूसाहेब यांचे वजन त्यावेळी शरद पवार यांच्या पेक्ष्या ज्यास्त होत. शरद पवार यांचे जेष्ठ बंधू बापूसाहेब आणि प्रतिभाताई सदू शिंदे यांची भेट झाली. त्यावेळी एक मुलगा आहे ग्रॅज्युएट झालं आहे. B.com आहे मात्र स्वतः काहीही करत नाही. गावाकडं शेती आहे आणि नुकताच आमदार झालाय अस बापू साहेबांना सदू शिंदे यांना सांगितलं त्यानंतर सदू शिंदे यांची जेष्ठ कन्या जिजा म्हणजेच प्रतिभा ताई यांना पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मात्र मुलगा शिकलेला आहे पण काहीच करत नाही हे ऐकल्या नंतर सदू शिंदे यांच्या वडिलांनी “बिन कामाचे स्थळ” असे म्हणत त्यांनी लग्नाला नकार दिला होता. पण हे स्थळ म्हणजे बापू साहेबांचा धाकटा भाव आहे हे म्हंटल्यावर प्रश्नच मिटला. त्यानंतर शरद पवार प्रतिभा ताईंना पाहण्यासाठी पुन्हा पुण्यात आले.

पवार साहेबांनी खादीचा जाड गर्द गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता. आणि तसलीच हिरविगार रंगाची पॅन्ट पण परिधान केली होती. पवार साहेबांनी प्रतिभा ताईंना पाहिलं आणि प्रतिभा ताईंच्या आजोबांनी पवार साहेबांना बघितलं. पवार साहेबांच्या मधील वक्तशीर पणा त्यांनी अचूक हेरला आणि लग्नाला होकार दिला. शरद पवार आणि प्रतिभा ताई यांचा विवाह बारामती मध्ये संपन्न झाला. विशेष म्हणजे त्यावेळी बारामतीमध्ये प्रचंड पाऊस होता आणि या विवाह समारंभाला पंचक्रोशीतील बरीच मंडळी उपस्तीत होती. आणि अश्या प्रकारे शरद पवार आणि प्रतिभा ताई यांचा विवाह संपन्न झाला आणि आजपर्यंत पाऊलो पावली शरद पवार यांना प्रतिभा ताई या साथ देत आहेत.

मित्रांनो आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published.