भारतातील सर्वात शक्तिशाली पैलवान, जो उचलत होता चक्क १२०० किलो वजन…

आज आम्ही आपणास इतिहासातील अश्या एका पैलवानाचा परिचय करून देणार आहोत, ज्यांचा कोणीही पराभव करू शकले नाही. हा पैलवान सामान्य माणूस नव्हता, त्याची शक्ती व दर्जा प्रचंड होता. जेव्हा तुम्ही या पैलवानाच्या शक्ती आणि आहाराबद्दल ऐकाल तेव्हा तुम्हाला त्यावरती विश्वास बसणार नाही. वास्तविक, आज आपण ज्या महान पैलवानविषयी बोलत आहोत तो इतर कोणी नसुन ते गुलाम मोहम्मद हे आहेत.

गुलाम मोहम्मद यांना ‘ग्रेट गामा’ आणि ‘गामा पैलवान’ म्हणून देखील ओळखले जात असे. तो केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात शक्तीशाली पैलवानपैकी एक आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी गामा पैलवान यांनी बर्‍याच लढती लढवल्या असून आजपर्यंत कोणताही कुस्ती पैलवान त्यांना कुस्तीच्या क्षेत्रात पराभूत करू शकलेला नाही. 22 मे 1878 रोजी जन्मलेल्या गामा पैलवान हे कुस्तीचे बेकग्राउंड असलेल्या कुटुंबातून आले आहेत. जेव्हा ते दहा वर्षांचे होते तेव्हाच ते कुस्तीच्या क्षेत्रात आले होते आणि त्यांच्या समोर येणाऱ्या प्रत्येक पैलवानांना ते पराभूत कारायचे. त्याची उंची फक्त 5 फूट 7 इंच होती. यामुळे इतर अनेक मोठ्या पैलवानांनी त्यांची खिल्ली उडविली परंतु गामा पैलवान यांनी कुस्तीच्या मैदानात सर्वांना चितपट केले व खिल्ली उडवणाऱ्यांचे तोंडच बंद झाले.

आपणास आश्चर्य वाटेल की गामा पैलवान रोज 5 हजार स्क्वेट्स आणि 3 हजार पुशअप्स लावत असत. इतकेच नव्हे तर ते इतका शक्तिशाली होते की ते 1200 किलो वजन उचलायचे. अशा सामर्थ्यवान व्यक्तीचा दैनंदिन आहारही खूप धोकादायक होता. गामा पैलवान हे रोज 10 लिटर दुध प्यायचे आणि 6 देशी कोंबड्या देखील खायचे. इतकेच नाही तर ते एक किलो बदामाची पेस्ट तयार करून टॉनिक म्हणून दररोज प्यायचे. 50 वर्षांच्या कुस्ती कारकीर्दीत, गामा पैलवान यांनी अनेक देशी-परदेशी कुस्तीपटूंचा पराभव केला होता, आणि त्यातील मजेशीर गोष्ट म्हणजे यांच्या समोर कोणतीही कुस्तीपटू काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकला नाही. बर्‍याच वेळा त्यांनी एका मिनिटापेक्षा कमी वेळात पुढच्या कुस्तीपटूचा पराभव केला.

तसे, गामा पैलवानने यांनी 7 फूट उंच भारतीय कुस्तीपटू रहीम बक्श सुलतानीवाला यांना देखील पराभूत केले आहे आणि तसेच विदेशी कुस्तीपटू फ्रँक गोच, बेंजामिन रोलरलाही पराभूत केले आहे. पण त्यांचा सर्वात तीव्र सामना स्टॅनिस्लॉस झ्बिस्झको यांच्याशी झाला यांना जगातील सर्वात खतरनाक कुस्तीपटू म्हंटले जायचे. जेव्हा गामा पैलवान त्यांच्याशी भिडले तेव्हा हा सामना सुमारे 2 तास 50 मिनिटे चालला, पण शेवटी गामा पैलवानच जिंकले. अशा प्रकारे गामा पैलवान हे अपराजित कुस्तीपटू बनले. जगभरात त्यांचे इतके नाव झाले की चीनच्या प्रसिद्ध कुंग फू मास्टर ब्रुस्लीनेही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. त्यांनी आपल्या प्रशिक्षणात गामा पैलवानांच्या अनेक डावपेचांचा समावेश करून घेतला.

23 मे 1960 रोजी एका दीर्घ आजारामुळे गामा पैलवान यांचा मृत्यू झाला. दम्याचा त्यांना अस्थमा बरोबरच हृदयाशी संबंधित आजारही होता. आज, कदाचित गामा पैलवान आपल्यात नसतील परंतु त्यांची क्षमता आणि कर्तृत्व नेहमी इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवलेले राहील

Leave a Reply

Your email address will not be published.