बायकोचे आणि आईचे जोरदार भांडण सुरू होते, नवरा एकच शब्द बोलला भांडण संपले….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला आई आणि बायकोचे जोरदार भांडण सूरु असताना, नवरा एकच शब्द बोलला आणि त्यामुळे त्यांचे भांडण संपले…..!! व तो नवरा असा कोणता शब्द बोलला असेल ज्यामुळे हे भांडण संपले, हे जाणून घेण्याची आतुरता आम्हला देखील आहे. ते चला मित्रांनो ज्यास्त न बोलता आपण ती गोष्ट वाचू ज्यामध्ये नवऱ्याच्या एका शब्दाने आई आणि बायकोचे भांडण संपले कदाचित आपल्या वरती देखील पुढे तास प्रसंग आला तर तो शब्द वापरू..……!!

मित्रांनो सरकारी कार्यालयात लांबच-लांब रांग लागली होती. खिडकी वरती ती क्लार्क बसला होता. तो रागीट स्वभावान सतत डाफरात होता. आणि सर्वांशी रागावून मोठ्या आवाजात बोलत होता. त्या वेळेसही एका महिलेला रागावत म्हणत होता “तुम्हाला थोडेही समजत नाही, हा फॉर्म भरून आणला आहे यात सर्वच चुकले आहे. सरकारने फॉर्म फुकट दिला आहे तर काहीही भरावं का? खिशातून पैसे द्यावे लागले असते तर दहा लोकांना विचारून भरला असता तुम्ही” एक व्यक्ती रांगेत उभा राहून बऱ्याच वेळेपासून हे पाहत होता. तो रांगेतून बाहेर पडून ऑफिसच्या मागच्या रस्त्याने त्या क्लार्क जवळ जाऊन उभा राहिला. आणि तेथे ठववलेल्या घागरीतून पाण्याचा एक ग्लास भरून त्या क्लार्क समोर धरला. क्लार्क ने त्या व्यक्तीकडे डोळे वटारून पाहिले मान वाळवून “काय आहे” इशारा केला. तुला व्यक्तीने क्लार्क ला म्हंटले “साहेब खूप वेळेपासून तुम्ही बोलत आहेत घास कोरडा झाला असेल पाणी पिऊन घ्या…!

” क्लार्क ने पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि त्याच्याकडे असे बघितले जसे काही दुसऱ्या ग्रहा वरचा प्राणी पाहिला आहे. आणि म्हणाला “माहीत आहे मी कटू सत्य बोलतो म्हणून सर्व माझ्यावर नाराज असतात, शिपाई व मला पाणी पाजत नाही” तो व्यक्ती हसला आणि परत रांगेत आपल्या जागेवर जाऊन उभा राहिला. आता त्या क्लार्क चे वागणे बदलले होते, अगदी शांत मनाने तो सर्वांचे ऐकून घेत व्यवस्तीत बोलत होता. आणि सर्वांचे काम त्याने व्यवस्तीत पार पाडले. सायंकाळी त्या व्यक्तीला एक फोन आला, दुसऱ्या बाजूला तोच क्लार्क होता. तो म्हणाला “भाऊ तुमचा नंबर तुमच्या फॉर्म मधून घेतला आहे,आभार मानायला फोन केला होता.” माझी आई आणि बायकोचे अज्जिबात जमत नाही आजही जेव्हा मी घरी पोहीचलो तेव्हा दोघींमध्ये वाद सुरू होता, परंतु तुमचा गुरुमंत्र कमी आला तो व्यक्ती एकदम स्तिमित झाला आणि म्हणाला “काय? गुरुमंत्र?” “हो मी एक ग्लास पाणी माझ्या आईला दिले आणि दुसरा ग्लास बायकोला आणि म्हंटले घास कोरडा पडला असेल पाणी पिऊन घ्या. बस, तेव्हापासून त्या शांत झाल्या आणि आम्ही तिघे हसत खेळत गप्पा मारत बसलो आहे.

“भाऊ आज जेवायला आमच्या घरी या” “हो पण जेवायलाच का?” क्लार्कने गदगदल्या स्वरात उत्तर दिले, “गुरू मानले आहे. तर एवढी दक्षिणा तर बनतेच ना आपली आणि हे पण माहीत करायचे होते की एक ग्लास पाण्यात इतकी ज्यादू आहे, तर जेवणात किती असेल.” मित्रांनो दुसऱ्यांच्या रागाला प्रेमाणेच दूर केले जाऊ शकते, कधी कधी आपल्या एकाद्या लहानश्या प्रेमळ वागणुकीने दुसऱ्या मनुष्यात खूप मोठा बदल घडून येतो. आणि प्रेमाने ओथंबलेले नाते एकदम सुरू होऊ लागते, ज्यामुळे घर आणि कार्यालयात ही मनाला शांती मिळते……!!
मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल, तुम्हाला या महितील गोष्टींचा उपयोग तुमच्या आयुष्यात करता येईल व तुमचा एकदा प्रश्न सुटेल…..!! ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये लिहून कळवा,,,,शेअर करायला विसरू नका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *