जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निर्लज्जपणे करा ही 3 कामे

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांनी दिलेले 3 उपदेश सांगणार आहोत. या गोष्टींमध्ये जो व्यक्ती निर्लज्य पणा दाखवतो, किंवा यामध्ये कठोरपणे व्यवहार करतो, तोच सुखी राहू शकतो. याचा उल्लेख आपले जेष्ठ व्यक्ती देखील करत होते. चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊयात कोणत्या तीन गोष्टींमध्ये कसा निर्लज्य पणा ठेवावा.

आचार्य चाणक्य पहिली गोष्ट सांगतात, जिथे पैसा येतो धन येते तिथे निर्लज्य बना:- एकाद्या ठिकाणी आपण पैसे गुंतवतो, किंवा उधार देतो अश्या वेळी ते पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, दुसऱ्याकडून पैसे परत मागताना संकोच वाटत असेल सतत मागण्याची लाज वाटत असल्यास समजून जा तुमचे नुकसान होणे अटळ आहे. अश्या परिस्थिती मध्ये धीट बनून वारंवार पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. जो पर्यंत पैसे परत मिळत नाहीत त्यापर्यंत निर्लज्य बनून राहणे तुमच्या फायद्याचे ठरेल.

दुसरे आहे, ज्ञाना मध्ये निर्लज्य पणा:- याचा अर्थ असा होतो जिथे आपल्याला ज्ञान मिळते, शिकायला मिळते, तिथे कधीही संकोच करू नये, मग ते ज्ञान शाळेमध्ये असो किंवा व्यावहारिक जीवनामध्ये समाजात वावरताना असो, जिथे ज्ञान मिळेल तिथून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानामध्ये जेवढी भर पाडता येईल तेवढी प्रगती ज्यास्त होईल. एखादी गोष्ट जेव्हा समजत नसेल तेव्हा त्याची विचारणा करायला माणूस घाबरतो ज्ञान मिळवण्यासाठी संकोचिर वृत्ती ठेऊ नका. ज्ञान हे अगदी लहान बाळापासून ते वृध्दा पर्यंत सर्वांना मिळते. मी ही माहिती माझ्या पेक्षा लहान व्यक्तीला का विचारू विचारल्यास माझा अपमान होईल..!! अशी भावना ठेवल्यास कधीही प्रगती होणार नाही. जेवढे ज्ञान वाढत जाईल तेवढी तुमची प्रगती होईल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील काही नवीन करण्याची जिद्द वाढेल. म्हणून जिथे ज्ञान आहे तिथे निर्लज्य पणा ठेवा. व शिकण्यासाठी तयार राहा..!!

तिसरा आहे व्यवसाय:- व्यवसाय मध्ये निर्लज्य बनुन राहणे खूप महत्वाचे असते, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी आपण काही उदाहरणे पाहू, काही businessman स्वतःच्या नातेवाईकांना business मध्ये सामील करतात किंवा त्यांना जॉब देतात. काही नातेवाईक काम करण्याच्या लायक नसूनही फक्त नाते संबंध जपण्यासाठी त्यांना business मध्ये समाविष्ट केले जाते. किंवा त्यांना आपल्या व्यवसाय मध्ये नोकरी दिली जाते. याचा परिणाम उलट होतो, business चे नुकसान होते कारण तो व्यक्ती काम करू शकत नसतो. त्याच्या जागी दुसरा योग्य व्यक्ती घेतला असता तर business मध्ये नुकसान होण्या व्यतिरिक्त फायदा झाला असता म्हणून अश्या व्यक्तीनपासून दूर राहा.

प्रसंगी निर्लज्य बना व अश्या लोकांना विरोध करा भलेही काहीवेळ नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला तरी चालेल. पुन्हा तो दुरावा भरून काढता येईल. जर तुम्ही सुद्धा धन, ज्ञान, व व्यवसाय या तीनही गोष्टींमध्ये निर्लज्य बनून राहिला तर सुखी जीवन जगाल….!! कोणालाही मदत करण्यापूर्वी त्याची योग्यता तपासून पहा. खरच ती व्यक्ती योग्य सल्यास मदत ही करा पण जर कोणी सरळ व्यवहार नसेल तर त्या ठिकाणी निर्लज्य बना. व स्वतःचे नुकसान होण्यापासून बचाव करा…..!

आम्ही आशा करतो की आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल, ही माहिती कशी वाटली ते कमेंट लिहून आम्हाला कळवा……!!

Leave a Reply

Your email address will not be published.