वडिलांच्या मुर्त्यूनंतर आईने मुलाला मोठे केले, पण बायकोमुळे आईला वृद्धाश्रम मध्ये सोडायला चालला पहा पुढे काय झाले….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला वडीलानंतर ज्या आईने मुलाला सांभाळले मोठे केले, पण बायकोमुळे तो मुलगा त्याच्या आईला वृद्धाश्रम मध्ये सोडायला चालला आणि त्या नंतर जे काही घडले ते पाहून तुम्हाला देखील समजेल की आपली आई आल्यावरती व आपल्या बायकोवर आणि मुलांवर किती प्रेम करत असते. तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया नेमके काय घडले. अगदी जड अंतकरणाने अविनाशने कारच्या डिक्किचा दरवाजा उघडला, आईची बॅग आत सरकवली, दरवाजा बंद केला. दरवाजाच्या काचेवर ठळक “आईची पुण्याई” लिहलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पाणावले..!

कारचा दरवाजा उघडला आई आत बसली अन गाडी निघाली. दोघेही शांत होते बाबा गेल्यावर सर्व घराची धुरा सांभाळत आईबाबा दोघांची जबाबदारी आपल्या सर्व आशा आकांक्षा बाजूला गुंडाळून आईने प्रचंड ताकतीने पेलवली होती. बाबा नंतर बाबांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील घर चालवत एकुलत्या एक अविचे उच्चशिक्षण, एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेज ची नौकरी, उच्च विद्याविभूषित संस्कारी घरातील मुलगी विवाह, एक गोंडस आजीच्या छत्रछायेत वाढलेली संस्कारी कन्यारत्न अन गेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी अविच्या स्वप्नातील त्याला घेऊन दिलेली ही कार सर्व अवीच्या आईची बाजू सातव्या महिन्यात जन्मलेली “मनु” कदाचित वाचणार नाही, असे डॉक्टरने सांगितल्यावर सर्व देव पाण्यात टाकून, बाबाचे वर्षश्राद्ध न करता सतत वीस दिवस आई दवाखान्यातून हलली सुद्धा न्हवती. मनू आज दहा वर्षांची झाली तरी आईपेक्षा आजीच्या सानिध्यात राहूनच तिचे “उत्तम संस्कार” आत्मसात केले होते, त्याचा परिणाम पण असा होता की शाळेच्या पालक सभेत जाणे अन मनूची प्रशंसा ऐकून घरी परत येणे…!! याशिवाय अवि अन उच्चविद्याविभूषित पत्नी”जयंती” कडे पर्याय न्हवता.! सर्वकाही ठीकठाक चालले होते.! आई आईचे सर्व काम स्वतःच करत होती.!

आजपर्यन्त आईने आविकडे एक रुपया देखील मागितला न्हवत.!नियमित चालणे, धार्मिक ग्रंथाचे वाचन, न चुकणार हरिपाठ यामुळे तिला दवाखाना माहीत न्हवता.! पण सर्वच सुखात चालले तर दुःखाने कोणाच्या खांद्यावर डोके टाकायचे….?? उच्चविध्याभूषित संस्कारी घरातील सून आणण्याचा आईचा निर्णय कदाचित चुकला होता.! सुंदर, सालस, संस्कारी, गर्भश्रीमंती होती पण माणसाला माणूस आणि प्राण्याला प्राणी समजण्याची कला तिला अवगत न्हवती.! छोट्या छोट्या गोष्टींमुळे, मैत्रिणींच्या सल्ल्यामुळे, माहेरच्या गुजगोष्टींमुळे तिने गेल्या तीन महिन्यांपासून अविचे अक्षरशः डोके खाल्ले होते, अन गेल्या पंधरा दिवसापासून अविशी अबोला केला होता.! विपन्नावस्थेत असलेला अवि प्रचंड मानसिक दबावाखाली जगत होता, त्याच्या मनात अस्तित्व निर्माण करणारी जननी विरुद्ध जन्मजन्मांतरी साथ देणारी(?) पत्नी यांचे पारंपारिक युद्ध तो प्रत्यक्ष अनुभवत होता. यांचा पूर्णविराम त्याला हवा होता. आईला कळू न देता त्याने एका वृद्धाश्रमाची माहिती तो काढून आला होता.! अन आज आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसवून त्या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता आणी ते पण याची आईला पूर्णकल्पना न देता..! त्याच्यासाठी हा दैवदुर्विलास गाडी गल्लीतून मुख्य रस्त्याला लागली ताकतीने पाळण्याची क्षमता असूनही गाडी फारच कमकुवत मनाचा चालक बसल्यामुळे अगदी चालकाच्या सोयीप्रमाणे चालत होती.

आईने पॉकेट ज्ञानेश्वरी काढली आणि वाचत बसली आईने अविला एका शब्दाने विचारले न्हवते कि तो तिला कुठे घेऊन जात आहे. कदाचित तिला कळले तर असेल.? त्याच्या मनात एक संघर्ष पेटला होता, आयुष्य घडवणारी आई का आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारी पत्नी…?? पण आई माझ्या भावना समजावून घेईल आणि माझ्या निर्णयाला नेहमी प्रमाणे समर्थन देईल या भावनेतून त्याने आईला न सांगता हे पाऊल उचलले होते. पण आईला प्रत्यक्ष बोलण्याची हिम्मत त्याच्यात अज्जिबात न्हवती काय सांगू ? कसे सांगू ? या विचारात गेल्या नव्वद दिवसा पासून होता तो एकाद्या मालिकेमध्ये भागात संपणार विषय तीन महिने घोळावा अन त्यातून काहीतरी अनपेक्षित बाहेर यावे तसाच हा विषय होता. समोरील चवकातून गाडी डावीकडे वळली महिन्याच्या वारीसाठी एकादशीला नाथमहाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या आईचा अगदी पाठ झालेला रस्ता असल्याने आईने त्या रस्त्याचे दर्शन घेतले. हळव्या मनाच्या अवीच्या डोळ्यांतून आश्रू थांबत न्हवते, सतत गालावर ओघळत होते, गडी वृद्धाश्रमाच्या दिशेने चालत होती अवीच्या मनातला संघर्ष तीव्र होत होता.! जगण्याची कला ज्या गुरूने शिकवली होती त्यांना तो अखिरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता. त्याच्या माथी आज भयंकर संकट धर्मयुध्दाच्या रूपाने उभे होते.! कोणत्याही परिस्थिती अपयश त्याचा पदरी पडणार होते…!!

अत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने त्याची नजर फक्त समोर होती. अवीच्या मनात विचार आला अवि दहा वर्षाचा असताना त्याचे बाबा गेले पण त्याच्या संगोपनात कसलीही कमतरता येऊ न देता त्याला आज समाजात ताठ मानेने फिरवणारी त्याची आई होती. इकडे मात्र जयंती (अविची पत्नी) घरातील आवराआवर करत होती आणि जयंतीला सासूची पर्स दिसते जाताना म्हातारीने कसली कळपट पर्स ठेवली म्हणून उत्सुकतेने जयंती ती उघडते तिच्या नावे केलेली पंधरा लाखाची एफ.डी. अन मनूच्या नवे केलेली दहा लाखाची एफ.डी. व आईचे काही जुने दागिने होते त्यात…!! जयंतीचे डोळे विसपार्ले त्यात आपोआप पाणी आले. ती ढसाढसा रडत होती स्वतःच्या मुलाच्या नवे एक रुपयाही न टाकता सून आणि नातीच्या नावे आपली सर्व पेन्शन समर्पित करणारी सासूच्या रुपात असलेल्या आईला काही क्षणा पूर्वी घरातून बाहेर काढले होते. स्वतःच्या नजरेत आज अपराधी झाली होती ती..!! तिने फोन उचलला….. अविला लावला. फोन वाजला, जयंतीचा होता, उचलला नाही, पुन्हा आला, उचलला नाही, पुन्हा वाजला, पुन्हा उचलला नाही. काय झाले किंवा काय केले.? यासाठी फोन असणार याची त्याला कल्पना होती……!! त्याच्या डोळ्यासमोर चारकाची दोन चाके स्पष्ट दिसत होती, एक आई अन दुसरी जयंती, मध्ये पिळून निघणार ऊस त्याला त्याचे अस्तित्व भासत होता. या सर्व प्रक्रियेत त्याला पालापाचोळा होणे त्याला अटळ वाटत होते…!!

एक पारंपरिक प्रथेत त्याचा बळी जाणार हे शाश्वत होते. समोर वृद्धाश्रमाची पाटी दिसली अविचे अंग थरारले..! आईच्या पदरातून बाहेर पडण्याची कला त्याला अवगत न्हवती त्याने गाडीची गती वाढवली अगदी पाटी आईला अस्पस्ट दिसेल येवढी वृद्धाश्रम मागे पडले पण पुढे जायचे कुठे अगदी थोड्या अंतरावर मंदिराजवळ गर्दी दिसली समोर लावलेले ब्यानर ओढून नव्याने निर्माण झालेल्या साई बाबांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा होती. असा संबोध होत होता गडी तिकडे आपोआप वळली आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तो पाहून अवीच्या मनालाही आनंद झाला आई कार्यक्रमात व्यग्न झाली आईला वृद्धाश्रमात न सोडण्याचा निर्णय त्याचं संवेदनशील मनाने घेतला होता काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत आई माझे अस्तित्व बनून राहील असा ठाम निर्णय त्याने घेतला होता आपण आईला कोणत्या कारणाने आणले हे आईला कळले नाही याचा आंनद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आत्तापर्यंत जयंतीचे जवळपास तीस कॉल येऊन गेले होते आईला सोडा लवकर या याशिवाय ती काय बोलणार म्हणून त्याने तिचे कॉल उचलले न्हवते.

आई अगदी तृप्त मनाने आणि आनंदी चेहऱ्याने देवळाच्या पायऱ्या उतरताना दिसली अवि लगबगीने तिच्या जवळ गेला दर्शन घेतले तिच्या हातातील प्रसादाची वाटी घेऊन गडीपर्यंत येऊन आईला गाडीत बसवले..!! एक नवी ऊर्जा नवा जोश संचारल्यागत तो वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवत होता. गाडी दारात येऊन थांबली….!! जयंती आली अन गाडीतून उतरण्याच्या तयारीत असणाऱ्या आईला अक्षरशः ओढत तिच्या गळा पडून रडत होती….! रडत रडत फोन का उचलत नाही म्हणून अविला भांडत होती. अविसाठी हे चमत्कारापेक्षा तीळभर सुद्धा कमी न्हवते. सहा वाजले तरी मनू शाळेतून आली नाही म्हणून जयंती चिंतीत पण होती. अविने व्हॅनच्या चालकाला फोन लावला, त्याने सांगितले की मनूला घरासमोर सोडले…!! आता अवीची आणि जयंतीची चिंता खरोखरच वाढली. आईने दोघांना मागे येण्याचा इशारा केला आणि जवळच असलेल्या गेल्या वीस वर्षांपासून दररोज न चुकता हरिपाठ साठी जाणाऱ्या मंदिरात घेऊन गेली. अवि आणि जयंती पहिल्यांदाच मंदिराच्या आवारात प्रवेश करीत होते. हरिपाठ आरती आटोपली होती. मनू सर्व आजींना आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैश्यातून प्रसाद म्हणून “खडीसाखर” वाटत होती.

आजीला बाहेर पाहून ती पळत येत तिला बिलगली ” आजी आज आपला प्रसादाचा वर होता ना , तू न्हवती म्हणून मी आले..! माझे काही चुकले का..?” “मनू “माझा वाघच काही चुकत का ??” दप्तरासगट तिला उचलून घेत आई बोलली…! तिच्या बाल मानवर झालेले तिचे पवित्र संस्कार आन आपल्या मनावर राग, लोभ भेद, मत्सर अहंकार अन पैश्याच्या मस्तीने केलेले व्यभिचार यांच्या तुलनेत अवि अन जयंतीचे मने खजील झाली होती. मित्रांनो संस्कार हे सर्वश्रेष्ठ आहेत…!!
मित्रांनो आशा करतो की आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये “आई” लिहून आम्हाला नक्की कळवा….!!

Leave a Reply

Your email address will not be published.