मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील अशा एका बस स्थानका विषयी सांगणार आहोत. ज्याला पाहिले की कोणीही हेच म्हणेल “हे तर Airport वाटत आहे”. तर चला मित्रांनो त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. “बल्लारपूर” चंद्रपूर जिल्यातील ऐतिहासिक शहर. औदयोगिक केंद्र असणारे हे शहर “Mini India” म्हणून ओळखले जाते. आता या शहराची ओळख “विमानतळा सारखं असणार बस स्थानक” म्हणून होत आहे.
भव्यता, दिव्यता, आणि नाविन्यता शोधणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांची ही बल्लारपूर मतदार संघाला दिलेली भेट आहे. 11 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले बल्लारपूर मधील हे बस स्थानक एकाद्या विमानतळासारखे दिसतं. प्रशस्त फलाट, मोठे वाहनतळ , सर्व सोईन युक्त चौवकशी कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आकर्षक आसन व्यवस्था आदी. मुळे या बस स्थानकाला पंचतारांकित रूप प्राप्त झाले आहे. राज्यात कुठेही इतके आकर्षक बस स्थानक बघितले नसल्याचे प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात.

या बस स्थानकात दोन मोठ्या झाडांचा वापर रंग संगतीचा माध्यमातून करण्यात आला असुन हे प्रवाश्यांसाठी सेल्फी पॉईंट ठरले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असे तालुक्याचे बस स्थानक म्हणून बल्लारपूरचे नाव लौवकीक वाढवत आहे.
मित्रांनो जर तुम्ही ह्या बस स्थानकाला भेट दिली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि ज्यांनी दिलेली नसेल त्यांना जर कधी वेळ भेटला तर इथे जाणून नक्की पहा किती सुंदर बस स्थानक आहे ते…..!!

मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये लिहून नक्की सांगा या मुळे इतरांना देखील ह्या विषयी अधिक माहिती समजेल…..!!